सगळ्यांच्या विनंतीस मान देऊन, “मी नाही अभ्यास केला…” मुळ (ओरिजीनल चा मराठी समानार्थी शब्द बरेच वेळ विचार करुन मीळाला
) बालगीत खाली नमुद करतो आहे.
“मी नाही अभ्यास केला…” – ओरिजीनल…
—————————————————
घड्याळ्यात वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले दोन
बाबाचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले तिन
ताईची हरवली पीन
पीन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले चार
आईने दीला मार
मार खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले पाच
ताईने केला नाच
नाच भघण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले सहा
आईने केला चहा
चहा पीण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले आठ
बाबानी आणला माठ
माठ पहाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले नऊ
घरात आली माऊ
माऊशी खेलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||
घड्याळ्यात वाजले दहा
पाहुणे आले पहा
पाहुण्याशी बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला||

[...] This post was mentioned on Twitter by memarathi, माझी दुनिया. माझी दुनिया said: RT @memarathi: MarathiBlogs: “मी नाही अभ्यास केला…”–ओरिजीनल http://bit.ly/bg0vEu [...]
अरे वा, वेगळे वाचून मजा वाटली.
ह्याची़च मी लहानपणापासून ऐकलेली आवृत्ती मी माझ्या अनुदिनीवर लिहिली होती.
http://maajhianudini.blogspot.com/2008/03/blog-post.html
आठला आम्ही वेगळे म्हणायचो.
घड्याळात वाजले आठ
दादाने फोडला माठ
वेचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
माझ्या लेकीलाही हे गाणं मी शिकवलेय्.
हो याचे बरेच व्हर्जन्स आहेत
धन्यवाद, माझ्या विनंतीला मान दिल्याबद्दल.. मी हे बालगीत कधीच गायले, ऐकले वा वाचले नव्हते. विचित्र ना !!! आवडले मला.
mi khup lahan astana he gane majhya shaletlya baaini amhala shikawle hote he punha wachun ase watle janu majhya shaletla mitr bhetla.
लहानपणीच्या आठवणी खरच मनाला आनंद देऊन जातात
[...] सगळ्यांच्या विनंतीस मान देऊन, "मी नाही अभ्यास केला…" मुळ (ओरिजीनल चा मराठी समानार्थी शब्द बरेच वेळ विचार करुन मीळाला ) बालगीत खाली नमुद करतो आहे. "मी नाही अभ्यास केला…" – ओरिजीनल… ————————————————— घड्याळ्यात वाजला एक आईने केला केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला|| घड्याळ्यात वाजले दोन बाबाचा आला फोन फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला|| घड्याळ्यात वाजले तिन ताईची हरवली पीन पीन शो … Read More [...]
कोणाकडे खालील बालगीताचा ऑडीओ आहे का?
” फुलपाखरू झालो मी, फुलपाखरू झालो. फुला फुलांचे पंख घेउनी बागेमध्ये आलो.”
दुर्गा जसराज ह्यांनी दूरदर्शनवर एकदा हे गायलं होतं पण मला ते पुन्हा कुठे ऐकायला मिळालं नाही. फार सुंदर गाणं आहे.