ऐकुन् जरा विचित्र वाटते आहे ना!! हा हा हा…हो हो सांगतो..सांगतो

तसा रोजच्या स्वयंपाकाचा ठेका माझ्याकडे असतो पण् आमच्या रुमचा एक् नियम् आहे..शनिवारी आणी रविवारी मी kitchen मध्ये शिरत् नाही..सब् अपने मजीॅ के मालिक है..ज्याला जे हवे ते बनवणे आणी खावे..

त्याचे झाले असे की, माझ्या सोबत् रहाणारे जे २ roommates आहेत् त्यांना “चिकन् बिर्यानी” बनवण्याचा जोश् चढला होता.youtube आणी vahrevah.com वर स्वतापेक्षा जास्त विश्वास् होता..बस् मग् काय्..सकाळी (वेळ् ११:३० ते १२:०० समजावी..) उठल्या उठल्या दोघे कामाला जुंपली..प्रथम youtube वर् “चिकन् बिर्यानी” बनवण्याची क्रुती (recipe ला मराठीत् क्रुतीच म्हणतात् ना??..असो..)ची शोधाशोध करण्यात् आली.शेवटी vahrevah.com वरची recipe पसंत पडली.मी मात्र त्या दोघांची मजा बघत् होतो.youtube वरील क्रुतीचे पारायण सुरु झाले.पारायण सुरु असतांना दोघांना एक् अघम्य प्रश्न पडला की, “half cooked rice” म्हणजे नक्की काय् भानगड् असते?..(हा हा हा!! मी मात्र पोट् दुखेस्तोवर् हसत् होतो..)

झाले तर् मग्..आता preparation ला सुरुवात् झाली.हळद्,तिखट्,धने-जीरे,गरम मसाला,मीठ्,राईस्..वैगरे वैगरे.प्रथम् ते साध्या तांदुळाची बिर्यानी बनवणार् होते..मग् मी सांगीतल्यावर् त्यानी बासमती तांदुळ घेतला.(मलापण् bossing करण्यात् जरा मजा येत् होती..असो!!)आता प्रश्न होता तो ‘fried onion’ चा.मी समोरच्या खोलित् बसुन् एक् उपदेश् केला..’तळुन् झाल्यावर् तेल् एका बाटलीत् काढुन् ठेवा..नंतर् कामी येईल्’..आणी मी परत् सिनेमा बघण्यात् गुंग झालो.थोद्या वेळाने अमित्(रुममेट्..)बाहेर् आला आणी म्हणाला..’तेल् तर् काहिच् उरले नाही?..’मला जरा doubt आला.मी kitchen मध्ये जाउन् बघितले तर्..हा हा हा!! मी पुन्हा पोट् दुखेस्तोवर् हसत् सुटलो..कारण् साहेबानी onion fry न् करता परतला होता…:-)

तरी दोघे काही हार् मानायला तयार् नव्हते.youtube वर् विश्वास् ठेउन् त्यानी लढाई पुढे सुरु ठेवली..नंतर् chicken marinate वैगरे करुन् झाले आणी शिजण्यासठी ठेवण्यात् आहे..हुश्श्!!हुश्श्!! करत् दोघे ‘विजयी मुद्रा’ घेउन् living room मध्ये येउन् सिनेमा बघण्यात् गुंग झाले. १०-१५ मिनीटात् छान् सुगंध् दरवळु लागला..mission फत्ते होणार् या विचारात् दोघे गॅस बन्द करण्यास् विसरले..आणी नको ते झाले..

थोद्या वेळाने जेव्हा आठवण् झाली..तेव्हा बघितले तर्..बिर्यानी ची खिचडी झाली होती..अर्धी बिर्यानी खाली लागली होती..हा हा हा!! आता या situation मध्ये हसावे की रडावे हेच् कळत् नव्हते..सगळे भुकेले झाले होते..कारण् या सगळ्या गंेाधळात् ३-३.३० कधी वाजले कळलेच् नाही..मग् काय् मुक् गिळुन् आम्ही चुपचाप् ‘चिकन् खिचडी’ चा फडशा पाडला…

Advertisements
प्रतिक्रिया
  1. Mahendra Kulkarni म्हणतो आहे:

    खुमासदार झालाय लेख. छान… लिहित रहा.

  2. Mahendra Kulkarni म्हणतो आहे:

    अरे नाही हो.. तसं नाही.. खरं तर मी पण हे प्रकार केले आहेत लग्नापुर्वी. आम्ही ४ मित्र रहायचो एकत्र. तेंव्हा असे प्रकार बरेचदा व्हायचे. पोळ्या करायला बाइ होती पण भाजी आम्हीच करायचो..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s