संस्कार्..म्हणजे नक्की काय् असत्?

Posted: मे 29, 2009 in अनूभव.., आठवणी..!!

आमच्या म्हणजे अनू आणी माझ्या आयुष्यात् आता नविन् पाहुण्याची चाहुल् लागली आहे. आनंदतर् ओसंडुन् वहातोच् आहे पण् सोबत् एक् काळजी देखिल् लागली आहे…”संस्कार्”..आई-वडिल् आपल्या आपत्यावर् करतात् ते…पण संस्कार् म्हणजे नक्की काय् असत्? हे कोडे काही केल्या मला सुटत् नाही आहे. आपण् आपल्या अपत्यावर् योग्य संस्कार् करु शकु की नाही? त्याला योग्य ते वळण लाउ शकु की नाही?.असे अनेक् प्रष्ण सध्ध्या मला त्रास देत् आहेत्. मग् विचार् केला की जरा आयुष्यात् मागे वळुन् पहावे आणी बघावे माझ्या बालपणात् काही धागे-दोरे मिळतात् का ते.

माझे बालपण तसे फार् ऐशो-आरामात गेले नसले तरी आई-वडिलांनी कशाचीच म्हणुन् कमी पडु दीली नाही.कपडे,वह्या-पुस्तक,चप्पल्-बूट् वैगरे. बाबांची सरकारी नोकरी होती. बेताचाच् पगार् होता. घरी २ बहीणी,मी आणी आई-बाबा असे कुटुंब.मी एकुलता एक् मुलगा,सर्वात लहान,त्यामुळे बहीणीं सारख्या म्हणायच्या..’आई तु प्रसादचे लाड् जास्त् करते’..(मला बरे वाटायचे पण अभ्यासाबद्द्ल आई जेव्हा मला फोडुन् काठायची तेव्हा मात्र माझ्या बहीणींची समजुत् कीती खोटी आहे हे कळुन् चुकायचे)

काल् आम्ही असेच् मॉलमधे शॉपींग करत् असतांना एक् मुलगा आपल्या वडीलांकडे हट्ट् करत् होता. त्याला एक् महागडी बंदुक हवी होती. तो मुलगा खोटे-खोटे अशृ काढुन् धिंगाणा करत् होता.शेवटी त्याच्या वडीलांनी ‘तु काही ऐकणार् थोडीस् आहेस्’ असल्या सौम्य शब्दात् कंटाळुन् त्याला होकार् दीला.

मला ह्या प्रसंगावरुन् माझ्या बालपणीचा एक् प्रसंग आठवला.मी ४-५ वीत् असेन.आमच्या वाड्याच्या बाजुला एक् “आनंदाश्रम” नावाचे लॉज् होते. त्याचा मालक गुजराथी होता. त्यांचा मुलगा आणी आम्ही वाड्यातले ३-४ मुल् असा ग्रुप होता.दुपारी १ ते ४ लॉज् बंद् असायचा,आणी सुट्टीमध्ये आमचा ग्रुप दुपारी तेथे खेळायचा. दीवाळीची सुट्टी सुरु झाली होती.एक्-दोन् दीवसांवर् दीवाळी आली होती.मी बाबांकडे फटाके,टीकल्यांची बंदूक वैगरे आणण्यासाठी भुण्-भुण् सुरु केली होती. बाकी सगळ्यांनी बहुतेक फटाके,टीकल्यांची बंदूक वैगरे आणली होती.

‘आज् जायचे ना फटाके आणायला?’- मी बाबांना घरी आल्या-आल्या विचारले.

‘उद्या नक्की जाउ ह् आपण्’- असे बोलुन् बाबा चहाचा घोट् घेउ लागले.

मी हिरमुसुन बाहेर् खेळायला निघुन् गेलो.(त्या वेळेला बाबांकडे हट्ट् धरण्याचे धाडस् आमच्यात् नव्हते..चुकुन् केलाच तर् बाबा काही न बोलता नुसते डोळे मोठे करायचे..आणी आम्हा “समजदार्” को ये ईशारा काफी होता था. 🙂 ). आमचा ग्रुप खेळत् असतांना त्या लॉज मालकाचा मुलगा त्याची नविन बंदुक् नाचवत् धावत् आमच्या कडे आला.सिनेमा मध्ये डाकुंकडे जशी बंदुक् असते तशीच् होती ती टीकल्यांची बंदूक.मलातर् फार् आवडली होती ती बंदुक्. बस्स्!! ठरवल आपणही हीच बंदुक घ्यायची.ह्या आनंदात् झोपलो.दुसर्‍या दीवशी रवीवार् होता,बाजाराचा दीवस(तेव्हा आत्ता सारखे मॉल् नव्हते..दर् रवीवारी आठवडी बाजार् भरायचा).आज फटाके आणायला जायचे हे नक्की होते.

मी आणी बाबा बाजारात् निघालो.पहीले भाजी,किराणा वैगरे खरीदी झाली आणी नेहमीप्रमाणे बाबा मला त्यांच्या मित्राच्या फटाक्यांच्या दुकानात् घेउन् गेले.मी मात्र ती बंदुक् शोधत् होतो. माझे फटाक्यांकडे काही लक्ष नव्हते.

‘बंदुकीचा रंग बघुन् घे,नाहीतर् मागच्या वेळे सारख् वापस् यावे लागेल्’ – बाबांच्या या वाक्याने मी भानावर् आलो.

‘मला ही बंदुक् नको.काका तुमच्याकडे ती दुसरी बंदुक् नाही का?’ मी आपल्या हातावर् त्या बंदुकीचे माप त्या दुकांदाराला दाखवत् म्हटले.

‘कुठली दुसरी? अरे नेहमी आपण् हिच् घेतो ना मग्?’ – बाबा.’नाही मला ती बंदुक् पाहिजे.’ मी बाजुच्या दुकानातली मला आवडलेली बंदुक् दाखवत् म्हटले.मग् आम्ही दुसर्‍या दुकानात् गेलो.बाबांनी प्रथम त्याची किंमत् विचारली.

‘२५ रुपये का एक्’-दुकानदार्

‘अरे!! ही खुप् महाग् आहे,आपण् आपल्या नेहमीच्या काकांच्या दुकानातुनच् घेउ’ बाबांनी मला दुकानाबाहेर् काठत् म्हटल.तेव्हाचे २५ रुपये म्हणजे आत्ताचे १०० रुपये.बाबा नुसत्या ४ दीवसांकरता एव्हडे पैशे खर्च् करणार् नव्हते.पण मी या वेळेस् थोडा हट्ट् सुरु केला.बाबांनी एक्-दोनदा समजुन बघीतले.डोळे मोठे करुन बघीतले.पण मी काही ऐकायला तयार् नव्हतो. मग् मात्र् बाबांनी जरा वरच्या स्वरात् बोलण्(आत्ताची मुले त्याला जोर्-जोरात् रागावणे असे म्हणतात्)सुरे केले.

‘प्रसाद्,ती बंदुक् फार् महाग् आहे. आपल्या जवळ् एव्हडे पैशे नाही आहेत्.’

‘पण संदीप् कडे आहे ती बंदुक्. मला तीच पाहीजे’ मी काहिसे रडवेल्या स्वरात् म्हटले.

‘संदीपच्या बाबांकडे खुप पैशे आहेत्. आपण् तसे श्रीमंत आहोत् का?..तुला समजत् नाही का?’ बाबा माझ्या पाठीत् एक् धपाटा घालत् बोलले.

मला आता कळुन् चुकले होते की मला ती बंदुक् मिळणार् नाही. नंतर् पुन्हा असा हट्ट् करण्याची हिम्मत् मी करु शकलो नाही.

पण् मला मात्र् भेडसावत् असलेल्या ‘संस्कार्..म्हणजे नक्की काय् असत्?’ या प्रष्णाचे उत्तर् सापडले होते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s