Archive for the ‘उपद्व्याप्’ Category

कार चालक प्रशिक्षण – एक छळ..

भारतात आल्या-आल्या काय जोष चढला होता काय माहिती पण कार घेण्याचे भूत माझ्या मनात थैमान घालते होते… (काय आहे बँकेत जरा जास्त पैसे दिसतं असले की त्याला वाट फोडण्याचे असे खूळ माझ्या मनात आलेच म्हणून समजा.. ) तर पहिली पायरी म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स साठी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जायचे ठरवले व नोंदणी केली.

प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता आणि त्या प्रशिक्षकाने मला माझ्या संपूर्ण शालेय जीवनात कोणी झापलं नसेल असे धडे(झापले) दिले. मी आपला अमेरिकेचा जवळ-जवळ २०००-२५०० माईल्स कार चालवण्याचा अनुभव चेहऱ्यावर मिरवतं कारमध्ये बसलो. मी आणि अजून एक आजोबा आणि एक तरुणी (बहुतेक तिला तिच्या वडिलांनी “तुला तुझ्या पुढच्या वाढदिवसाला कार घेऊन देणार” असे आश्वासन दिले असणार.. असले बाबा आम्हाला का बरं नाही मिळाले.. 😦 असो)

प्रथम आजोबांनी कारचा ताबा घेतला.. बहुतेक सीनियर सिटीजनाच नियम येथे सुद्धा लागू होतो असा त्यांचा समज असावा कारण ‘त्या’ तरुणीने जेव्हा प्रथम ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आजोबांनी जो कटाक्ष टाकला त्यामुळे ती सुद्धा बिचकली. एक तर सकाळची ऑफिसची वेळ त्यामुळे ट्रॅफिक अपनी पुरी जवानी पे था आणि दुसरे म्हणजे नेहमी प्रमाणे रस्त्याचे काम सुरू होते त्यामुळे आणखीन कोंडी होत होती आणि आजोबा आपल्या तरुण पणीचे दिवस आठवतं तो एक्सलेटर पूर्णं जोर लावून दाबत होते. त्यांचा चेहरा बघून तो जोर “दुसरी” कडे पडून काही भलतेच होईल का अशी शंका वाटत होती 🙂 आजोबा पूर्णतः गडबडले होते कारण इतका एक्सलेटर दाबूनही ही गाडी पुढे का जात नाही.

“काय करताय पहिले गेयर तर टाका. ” तुसडेपणा या शब्दाचा पुरेपूर समर्थन करीत त्या प्रशिक्षकाने आपला दिवस सुरू झाल्याची ग्वाही दिली.

“अहो.. काय करताय.. नीट बघा.. वळवा ना.. अरे गेयर बदला ना.. ” असे एक ना दोन पाणउतारा करणारे घोषवाक्य म्हणत तो आम्हाला शिकवत (??? ) होता. मग आजोबांचे खेळणे झाल्यावर “त्या” तरुणीने गाडीचा ताबा घेतला. मी असतील-नसतील तेव्हड्या देवांना साकडं घातले (एक कोणीतरी येईलच वाचवायला).

तिने बसल्या-बसल्या पहिले हॉर्न वाजवला. मला वाटले की ती तपासून बघत असेल. पण नंतर पूर्णवेळ ती त्या हॉर्नवरच बसली होती. तिला बहुतेक घरून सांगितले असेल “बेटा.. दर २-३ सेकंदाने हॉर्न वाजवायचा”. मी अमेरिकेतले दिवस आठवत होतो.. तिथे खरंतर हॉर्न हा गाडीचा ऑप्शनल पार्ट असतो… असो 🙂

मग शेवटी माझी वेळ आली. मी आपला आपल्याला गाडी येते या तोऱ्यात बसलो. गाडी चालू केली आणि एक्सलेटर दाबला. पण हे काय? गाडी पुढे का जात नाही? मग प्रशिक्षकाने गोड आवाजात “अहो.. गेयर तर टाका. नुसते एक्सलेटर काय दाबताय. “वैगरे बोलून माझा उद्धार सुरू केला. मी आपला अरे हो खरंच की वैगरे बोललो आणि गेयर टाकायला गेलो तर.. “ख्खरखर्ख्र” असा विचित्र आवाज येत होता. मग तो प्रशिक्षक जाम चिडला व कुठून-कुठून लोक गाडी शिकायला येतात असला “लुक” देत गेयर टाकला.

मग मी त्या जत्रेरुपी रोड(??? काही केल्या दिसतं नव्हता) वर निघालो. डावीकडून, उजवीकडून मागून पुढून (अवचोर ध्वातात – अर्थात चारही दिशांनी) सगळीकडून बाइक, कार, सायकल, पादचारी, गाय, म्हॅस (ह्या शेवटच्या दोन वाहनांवर कोणी बसले नव्हते 🙂 ) असे विविध वाहने येत होती. मला तर वाटत होते की अजून काही वेळात गाडी वरून सुद्धा काही वाहने निघतील. तो प्रशिक्षक सारखा माझ्या अंगावर खेकसत होता “अरे.. गाडी चालवा.. वेग वाढवा” मी मात्र पूर्णतः गडबडलो होतो. साला जागा कुठे आहे गाडी जायला.

शेवटी हो-नाही करत एकदाचा माझा क्लास संपला(एकदाचा). नंतरच्या क्लास मध्ये मी त्या प्रशिक्षकाला कधीच सांगितले नाही की मला गाडी येते म्हणून.. 😦

Advertisements

ले चले हम इंडीया जान-ओ-तन् साथीयो..
अब तुम्हारे हवाले किचन साथियो..

जस् जसे माझे इंडीयाला जाण्याचे दीवस जवळ् येता आहेत्,तस् तसे मझे कुठल्याही कामात मन लागत् नाही आहे.’स्वयंपाक’ हे त्यातलेच एक् काम.३० जुन ला अजुन् महिनाभर् अवकाश् आहे तरी मला आत्तापासुनच जायचे वेध् लागले आहेत्.म्हणुन ठरवले की किचन मधुन् सुध्धा आपला पाय काठता घ्यावा.

एक् तर माझ्या हातचे खाउन्-खाउन् मलाच कंटाळा आला आहे.(मला तर् आईचे फार् कैतुक वाटते बुवा..ती कशीकाय ३०-३५ वर्ष् झाले न कुरकुर करता स्वयंपाक करतेय्..मला तर् एका वर्षातच कंटाळा आला आहे.)दुसरे म्हणजे लक्ष लागत् नाही आहे म्हटल्यावर् उगाचच जेवण् फसले म्हणजे आपल्या सोबात् आमच्या रुम मेटस् ची पण् पंचाईत् होणार.मग हार्टवर्(रु..हु..द..या..हा..व..ह..र.. लीहीणार् होतो पण फार् वेळ् लढल्यावर् पण् काही जमले नाही..असो)दगड ठेउन निर्णय घेतला की..’जहापना आजसे स्वयंपाक घर मे कदम नही ठेवेंगे’..अशा आवेशात् विंगेतुन(बेडरुम) येतांना मी वाक्य फेकले..(रुम मेटस् ना माझा आवेश पाहुन मी कमरेतुन् तलवार् वैगरे काठतो की काय असे वाटले..)

आता माझ्या बटालीयन ने माघर् घ्यायचे ठरवल्यावर..ज्या बटालीयन ने ‘चिकन खिचडी’ चा प्रयोग केला होता त्यांनाच किचनचा मोर्चा सांभाळावा लागणार् आहे.

सगळ्यांचे म्हणणे आहे की अजुन् तर् महीना आहे जायला..आत्ता पासुनच काय् उडतो आहेस्?..पण् खर सांगायचे तर् माझे शरिर जरी येथे असले तरी माझे मन कधिच् इंडीयाला पोहोचले आहे.

आता नविन बटालीयनला मोर्चा सांभाळुन एक् दीवस झाला आहे…तेव्हड्यातच त्यांनी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्षण सुरु केले आहे.काल शनिवार् होता त्यामुळे सकाळी जरा पोहे खाण्याचा मुड होता..तर् “पोहे करता का?” या साध्या प्रष्णाला ‘पोहे करता येत नाहीत’..असे उत्तर् देउन्..हेडन जसा सलिल अंकोलाच्या फुलटॉस् ला एका हातानेच बॉड्रीबाहेर् फेकेन तसा माझा प्रष्ण टोलावला.सलिल अंकोला मला अजुनही आठवतो म्हणुन माझा शाल-श्रीफळ(पुण्यात येण्या अगोदर श्रीफळ हे सिताफळ आणी रामफळ या दोघांच्या मधले फळ् असावे असा माझा समज होता..)देउन लाकडीपुलावर् सत्कार वैगरे करु नका..कारण या वेळेला मला सलिल अंकोला पेक्षा अधिक कमकुवत् गोलंदाज मिळाला नाही म्हणुन. (आयला..’गोलंदाज’..मराठी सुधरतेय माझे..माझे मराठीचे देव गुरुजींना किती आनंद् झाला असता..पण चांगले दीवस पहाणे त्यांच्या नशिबातच नव्हते..असो).

आता पहिल्याच दिवशी अशी सुरुवात् झाली आहे..देखते है..आगे-आगे क्या होता है?…

चले चलो..

चले चलो..

आता तुम्ही म्हणाल् ‘हा काय् नविन् उपद्व्याप्?’..अमेरीकेतच् गोर्याना ‘हा देश् सोडुन् जा..वैगरे’ असली काही चळवळ तर् सुरु नाही ना केली?

नाही..नाही..तसले कही नाही.आम्ही ना कुठली चळवळ सुरु केली आहे ना आम्हाला कोणी गाडीतुन् बाहेर् फेकले आहे.गांधीजीचा वारसा जरा आम्ही दुसरया प्रकारे ‘चालवतो’ आहे.

गांधीजीची ‘दांडी यात्रा’ आम्ही काही दिवस् झाले रोज् थोडी-थोडी अशी चालवतो आहे.मागच्या २ week पासुन् आम्हाला पायी office ला जावे लागते आहे..:-(

आमचा एक् roommate ज्याच्याकडे गाडी होती त्याला काही कारणास्तव् India ला वापस् जावे लागले.तो गेला त्यामुळे त्याची गाडीपण विकावी लागली.आता जे रुममध्ये रहातात् ते short-term वर् असल्यामुळे कोणीच् गाडी घ्यायला तयार् नाही.मी पण् जुनच्या शेवटी वापस् जाणार्..बर् रोज् cab बोलवावी म्हणाल् तर् घर् ते office जास्तीत् जास्त १-१ १/२ miles असेल्…आणी cab बोलवायची म्हणजे रोजचे $२० जाणार्..(२० * ५० = १०००Rs..आता हे रुपयात् convert करायची गरज् नसते..पण् माझे दोन्ही roommate अमेरीकेत नविनच आले आहेत् त्यामुळे हे होणारच्..असो).

मग् काय् दुसरा कुठलाही पर्याय् नसल्यामुळे पाय्..हे जणु देवाने फुकट् दिलेले वाहन् आहे व् त्याचा जास्तीत् जास्त वापर् व्हावा म्हणुन् रोज् office ला पायी जाणे सुरु आहे.माझी ही यात्रा जुन् संपेपर्यतच् सुरु रहाणार्..पण्..तो पर्यत माझ्यात् ‘मी’ कीती उरतो ते माहीत् नाही.

पु.ल. च्या भाषेत् सांगायचे झाले तर्..office ला पोहोचल्यावर पाय..हा शरिराचा एक् अवयव नसुन् शरिराला जडलेली एक् व्याधी आहे..असेच् वाटते..:-(

ऐकुन् जरा विचित्र वाटते आहे ना!! हा हा हा…हो हो सांगतो..सांगतो

तसा रोजच्या स्वयंपाकाचा ठेका माझ्याकडे असतो पण् आमच्या रुमचा एक् नियम् आहे..शनिवारी आणी रविवारी मी kitchen मध्ये शिरत् नाही..सब् अपने मजीॅ के मालिक है..ज्याला जे हवे ते बनवणे आणी खावे..

त्याचे झाले असे की, माझ्या सोबत् रहाणारे जे २ roommates आहेत् त्यांना “चिकन् बिर्यानी” बनवण्याचा जोश् चढला होता.youtube आणी vahrevah.com वर स्वतापेक्षा जास्त विश्वास् होता..बस् मग् काय्..सकाळी (वेळ् ११:३० ते १२:०० समजावी..) उठल्या उठल्या दोघे कामाला जुंपली..प्रथम youtube वर् “चिकन् बिर्यानी” बनवण्याची क्रुती (recipe ला मराठीत् क्रुतीच म्हणतात् ना??..असो..)ची शोधाशोध करण्यात् आली.शेवटी vahrevah.com वरची recipe पसंत पडली.मी मात्र त्या दोघांची मजा बघत् होतो.youtube वरील क्रुतीचे पारायण सुरु झाले.पारायण सुरु असतांना दोघांना एक् अघम्य प्रश्न पडला की, “half cooked rice” म्हणजे नक्की काय् भानगड् असते?..(हा हा हा!! मी मात्र पोट् दुखेस्तोवर् हसत् होतो..)

झाले तर् मग्..आता preparation ला सुरुवात् झाली.हळद्,तिखट्,धने-जीरे,गरम मसाला,मीठ्,राईस्..वैगरे वैगरे.प्रथम् ते साध्या तांदुळाची बिर्यानी बनवणार् होते..मग् मी सांगीतल्यावर् त्यानी बासमती तांदुळ घेतला.(मलापण् bossing करण्यात् जरा मजा येत् होती..असो!!)आता प्रश्न होता तो ‘fried onion’ चा.मी समोरच्या खोलित् बसुन् एक् उपदेश् केला..’तळुन् झाल्यावर् तेल् एका बाटलीत् काढुन् ठेवा..नंतर् कामी येईल्’..आणी मी परत् सिनेमा बघण्यात् गुंग झालो.थोद्या वेळाने अमित्(रुममेट्..)बाहेर् आला आणी म्हणाला..’तेल् तर् काहिच् उरले नाही?..’मला जरा doubt आला.मी kitchen मध्ये जाउन् बघितले तर्..हा हा हा!! मी पुन्हा पोट् दुखेस्तोवर् हसत् सुटलो..कारण् साहेबानी onion fry न् करता परतला होता…:-)

तरी दोघे काही हार् मानायला तयार् नव्हते.youtube वर् विश्वास् ठेउन् त्यानी लढाई पुढे सुरु ठेवली..नंतर् chicken marinate वैगरे करुन् झाले आणी शिजण्यासठी ठेवण्यात् आहे..हुश्श्!!हुश्श्!! करत् दोघे ‘विजयी मुद्रा’ घेउन् living room मध्ये येउन् सिनेमा बघण्यात् गुंग झाले. १०-१५ मिनीटात् छान् सुगंध् दरवळु लागला..mission फत्ते होणार् या विचारात् दोघे गॅस बन्द करण्यास् विसरले..आणी नको ते झाले..

थोद्या वेळाने जेव्हा आठवण् झाली..तेव्हा बघितले तर्..बिर्यानी ची खिचडी झाली होती..अर्धी बिर्यानी खाली लागली होती..हा हा हा!! आता या situation मध्ये हसावे की रडावे हेच् कळत् नव्हते..सगळे भुकेले झाले होते..कारण् या सगळ्या गंेाधळात् ३-३.३० कधी वाजले कळलेच् नाही..मग् काय् मुक् गिळुन् आम्ही चुपचाप् ‘चिकन् खिचडी’ चा फडशा पाडला…

P90-X…

Posted: मे 12, 2009 in उपद्व्याप्
टॅगस्, ,

सद्या व्यायामचे भृत संचारले आहे!!!

दीवसभर् माणुस् त्या “computer” नावाच्या शत्रु सन्गे लठा देत् असातो..पण् शारिरिक् activity काही होत् नाही.मग् ठरवल् कि रोज् सकाळी Jogging करायचे.वजन् कमी करायचे..वैगरे वैगरे…:-)..(खर् तर् अमिर् खान् चा “गजनी” पाहिला आणी ठरवले..हा माणुस् चाळीशीत् जर् अशी फिगर् बनऊ शकतो तर् आपण् का नाही?..)

पहिले २-३ वीक् जरा बरे गेले..पण् मग् रोज् तेच् तेच् पळणे जिवार् यायला लागले आणि वजन् पण् काहि केल्या कमी होत् नव्हते.

नेट् वर् फार् शोधल्यावर् “P90-X” नावाचा Program सापडला.खर् सांगतो..फार् उपयोगी आहे हा.या Program मधे ऐकुण ३ फेज् आहेत. ९० दीवसानचा हा Program आहे. मला आवड्लेली भाग् म्हणजे हा Program शरीराच्या प्रत्तेक् अवयवावर् काम् करतो.

Program मधे Yoga, Polymetrics (उड्या मारणे!!), Kempo(कराटे), Cardio, Shoulder, Chest, arms etc अश्या विविध exercise चा समावेश आहे.

फायदे:
१. यामुळे फायदा असा होतो कि तुम्हि बोर् होत् नाही..तेच् तेच् exercise करुन् कंटाळा पण् येत् नाही…:-)
२. वजन् कमी होते (बेडेकर् जेवढी चविची guaranty देत् नसेल् तेवढी guaranty मी देतो..)
३. बी.पी/शुगर/हे ना ते..सगळे रोग् दुर् पळतील्..
४. बायको पोटाला “मडक्” म्हणणार् नाही..:-) (फार् मेहनत् घेतली तर् “Six-pack” तयार् होतिल्..)
५. रोज् ताजे-तवाणे वाटते

तोटे:
१. वेळात् वेळ् काढुन् रोज् exercise करावी लागते..:-(

यातिल् वीनोदचा भाग् सोइला तर् खरच् सांगतो,तुम्ही तुमच्यात् ला बदल् बघुन् म्हणाल्…

“यही है राईट् चॉइस बेबी..आहा..!!”

अधीक् माहिती साठी : P90X