Archive for the ‘विचार’ Category

अमिताभच्या हजारो-करोडो चाहत्यांपैकी मी सुद्धा एक आहे. हा पोष्ट कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नसुन..केवळ एक विनोद आहे. तरी खालील लेखामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी मनापासुन त्यांची माफ़ी मागतो.

सानपाड्याचा पक्या कोण जाणे कसा पण कौन बनेगा करोड्पती पोहचतो आणि “फ़ास्टेस फ़िंगर फ़र्स्ट” मधे पण बाजी मारतो.

“आईये पक्याजी हम और आप मिलके खेलेंगे…कौन बनेगा करोड्पती”..अमिताभ आपल्या शैलीत बोलतो.

“हा..चलो ना..वैसे भी बहुत टाइम हो गयेला है..शांताके साथ पत्ते खेले हुवे…”..पक्या आपल्या इस्टाइल मधे.

“हा हा हा…आप बहुत मजाकिया है..हाय..” अमिताभ आपल्या स्टाईलमधे (हात वाकउन वैगरे)
“चलिये हॉट सिट पे बैठते है”

“ऎ..गरम-वरम पे नही बैठेगा अपुन हा..पहलेच बोल देता है..मस्त ए.सी. लगा और उसको अपनी तरफ़ घुमा..बहुत गरम हो रेला है..”
अमिताभ ऎकुन न ऎकल्यासारखे करतो व दोघे खेळायला सुरुवात करतात.

“पक्याजी ये रहा आपके सामने पहिला सवाल पाच हजार रुपयोके लीये…”

“अरे ..कायको टाईम खोटी कर रहा है ..डायरेक्ट एक करोडवाला पुच ना..तेरा भी टाईम बचेगा और मेरा भी..क्या बोलता है?”..पक्या आपला डोका लाउन विचारतो.

“हा हा हा…आप बहुत मजाकिया है..हाय..” अमिताभचे आता हळु-हळु पारा चठत आहे.

“ये रहा आपका पहिला सवाल”

बेगाने शादी मे ________ कौन दीवाना है? १> राम २> बलराम ३> अब्दुल्ला ४> पागल

“साला अब ये बेगाने के शादीमे मै नही जा सका था उस दीन..वो लंगड्या ताट्याने राडा किया था ना..अब साला वो बेगानी के बहुत लफ़डे थे हा मोहोल्ले मे…मै बोलता आपको..वो अपना अली, फ़िर लगेस तो वो अन्वर, फ़िर वो बाजुवाले खोली का मन्ग्या…”
अमिताभ त्याला मधेच थांबत विचारतो “आपके पास सिर्फ़ २० सेकंद है जवाब देने के लिये…अगर आपको कुछ मुशकिल है तो आप लाईफ़-लाइन युज कर सकते है”..अमिताभ थोडा रागातच विचारत होता.

“थीक है..मै उस्मान को पुचता हु…फोन लगवो तो जरा उसको..वो था उस दिन शादी मे”

“कॉपुटरजी, उस्मान को फ़ोन लगाया जाये”..अमिताभ चिडुन.

“आयला…कही पे भी फ़ोन लगता है क्या?..कोनसा मोडल है?..” पक्या अजुन आगीत तेल घालत होता..

“नही..ये मै नही कॉपुटरजी फ़ोन लगा रह है..”

बरेच वेळाने एकदाचा तो फ़ोन लागतो.

“हॅलो…”
“कौन है बे?”…पलिकडुन उस्मान खेकसला.
“मै..अमिताभ बोल रहा हु..कौन बनेगा करोड्पती से”..अमिताभ एकदम जोश मधे म्हणाला.

“अच्छा..तो मै शीवाजी बोल रह हु बोल…” उस्मान ने एकदम अमिताभची विकेट काढली..

“हा हा हा…”…अमिताभचा चेहरा आता लाल होत चालला होता. “नही नही..हम”

“ए..सलीम अभी मेरा भेजा मत घुमा तु…हर बार अलग-अलग आवाजे निकालता है और मुझे उल्लु बनाता है…मै तेरे को बोला था के दादर को माल पहुचा के आना…तु किधर भटर रहा है?”

अमिताभचा चेहरा आता रडकुंडीला आला होता..तेव्हड्यात पक्या बोलतो…
“अरे…उस्मान शेठ, मै पक्या इधर वो कौन बनेगा करोड्पती से बोल रेला हु..”
“अरे पक्या क्या फ़िर पहले कायको नही बोला..मै तेरी आवाज सेही पहचान लेता..” उस्मान आणि पक्या मोठयाने हसतात…
अमिताभ रडत-रडत खेळ सोडुन जातो.

Advertisements

काल माझ्या मित्राचा फ़ोन आला होता. तो घर घेतोय आणि एस.बी.आय. बँकेकडुन लोन घेण्याबद्दल तो विचारत होता. मी त्याल म्हटले लोन तर मिळेलच पण त्या आधी २-३ गोष्टींची तयारी ठेव.

१. कमीत-कमी शब्दात स्वतांचा पाणउतारा करुन घेणे
२. लोनची तुला गरज आहे बँकेला नाही
३. तुझ्यापुढे राहुल राँय सुद्दा बीझी वाटेल इतका तु रिकामा आहेस.
४. तुज़्या जीवनात लोन पास करुन घेणे हे एकच धेय राहिल (निदान पुढचे २-३ महिने)

मी हे सगळे सांगीतल्यावर तो जरा घाबरलाच. मी म्हटले घाबरु नको रे, पण मनाची तयारी करुन ठेव. साहेबांनी डोक्यावर जास्त ताण न ठेवता सरळ प्रश्न केला
“मला एखाद्या एजन्टचा नंबर दे”
“एजन्ट? अरे या कामसठी तुला एजन्ट कशाला हवाय?” मी जरा चिडुनच बोललो.
“म्हणजे हे काम तु स्वतां केले?” मीत्राने अगदी मी दुपारी १ ते ४ च्या वेळेत चीतळे बंधु कडुन बाकरवडी विकत घेण्याइतके अशक्य काम केल्याचे आश्चर्य करुन विचारले.

मला हल्ली खरच कळत नाही आज-काल लोकांना प्रत्तेक गोष्टीसाठी एजन्ट का लागतो?
मान्य आहे बरेच वेळेस वेळ नसतो, गोष्टी लवकर हव्या असतात, पण नेहमीच असे असते असे नाही. बरेच वेळेस तर मला वाटते की लोकांना सरकारी कामांबद्दलची प्रक्रिया माहीती नसते, शिवाय ती जाणुन घ्यायची नसते 😦 त्यामुळे उठ-सुट एजन्ट शोधा आणि यामेळेच त्यांचे फ़ावते.
एजन्ट लोक वाट्टेल ती फ़ी मागतात. जे काम सहज होऊ शकते त्यासाठी लोक उगीचेच या एजन्ट चा खिसा गरम करतात.
पुण्यात तर या एजन्ट लोकांनी उच्छाद मांडलाय नुसता. भाड्याने घर घेण्यासाठी तर हे लोक कळस करतात. मागे मी एकदा घर भाड्याने घेण्यासाठी शोधत होतो. बरेच लोकांनी सल्ला दीला के “अरे, एजन्टच्या मदतीने लवकर घर मिळेल..थोडे पैशे जातात पण तुला घाई आहे तर लगेच मिळेल घर”
म्हटल आपल घोड अडलय तर चला धरावे पाय एजन्टचे (इथे मला जे म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले असेलच). मी एकाला फ़ोन केला तर साहेबांनी ३-४ घर असल्याचे सांगितले. ते मलाच बघवे लागणार होते, शिवाय तो मालकाशी भाडे/डीपाँझीट कमी करण्याबाबत काहिच मदत करणार नाही. मी विचारले “तुमच्या फ़ी चे काय? ”
तर साहेबांनी लिस्ट्च सुरु केली.
“दोन महीन्याचे भाडे, स्टाँम्प पेपरची पैसे वेगळे. पेपर तुम्हाला आणावा लागेल.” मी मनात म्हटले हो..तुझा हुन्ड्यात द्यायचे राहिले होते ना.
“जर एक वर्षानंतर नविन करार करायचा असेल तर मला एक महिन्याचे भाडे द्यावे लागेल.” मी विचारले “तुम्ही मला घर दखवण्यापलीकडे काहीही मदत करत नाही आहत..तर मग हे नविन करारचे पैसे का?”
“साहेब, असेच असते ते..तुम्हाला पहिजे की नाही ते बोला?”
मी कपाळाला हात लावला आणि फ़ोन ठेवला. ईतके करण्यापेक्षा मी माझ्या रहात्या घरात ५०० रुपये भाडे वाठउन राहीलो तर मला स्वस्त पडेल. 🙂

हे असे सुरु असते, तरी सगळे याला डोळे झाकुन बळी पडतात. थोडा त्रास घ्यावा लागतो पण ही छोटी-मोठी कामे सहज शक्य आहेत.
हे जर असेच सुरु राहिले तर, बापाच्या शेवटच्या विधीसाठी सुद्धा एजन्ट शोधणारी माणसे दिसतील.

Two thousand prints, around 10,000 shows, international technicians and makeup artists, award winning sound engineering and music – as the extravagant 200-crore saga unfolds this weekend – it will also shatter the myths of ‘small market, small budget’. The notions of ‘Tamil cinema being a small market and hence there are restrictions with regard to budget’ will be flushed down the drain as Endhiran releases to a whopping number of 600 screens in Chennai city alone.

 आता तुम्हीच सांगा असला जबरदस्त सिनेमा सोडणार आहे का?

तिकिटांसाठी १-२ मित्राकडे चौकशी केली, तर काळाले की १ तासात सर्व तिकिटे विकल्या गेली. हीच कहाणी सगळीकडे होती. मी पण मग जिद्दीला पेटलो. काही करून तिकीट मिळवायचेच. ४-५ कॉन्टॅक्ट कडे हात-पाय जोडुन विनंती केली, तेव्हा कुठे ब्लॅकमधे ५०० रुपयात तिकीट मिळवले. (बायकोला जर हे कळले तर त्या रुपयात करू शकणार्‍या १०० गोष्टी ऐकवल्या असत्या ..असो)
शेवटी तो दीवस उजाडला. आज महानायक रजनीकांत चा सिनेमा बघणार होतो. दुपारी १२:०० चा शो होता, म्हटल उशीर नको म्हणून १०:०० वाजताच घरातून निघालो. हो म्हटल नेमक नाहीतर ट्रॅफिक मधे अडकायच आणि रजनी दा ची एंट्री जायची 🙂

सीन १:
कामवाली बाई: साहेब, आज थोडे पैसे उधार हवे होते
बाबा: किती?
कामवाली बाई: १०० रुपये साहेब
बाबा: प्रसाद, बाईना १०० रुपये दे तर.
मी: बाई, कशाला हवे आहेत पैसे? मझयाकडे नाही आहेत सध्या.
कामवाली बाई: साहेब, पोराची शाळेची फी भरायची आहे.
मी: नाही.
(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन २:
बहादूर (गेट-कीपर): सहाबजी, वो मेरा तबियत खराब है काल से…
मी: हा तो डॉक्टर के पास जावो ना..मेरा डोका क्यु खाता है?
बहादूर: सहाबजी, १०० रुपये मिल जाता तो दवाई लेके आयेगा साहबजी.
मी: अभी नही है..जावो तुम.
(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन ३:
ट्रॅफिक सिग्नलवर बाइक थांबवली. रस्त्याचा बाजूला उभी असलेली एक भिकारी म्हातारी मझयाकडे आली.
म्हातारी: पोरा, काल पासून अन्न नाही रे पोटात. काहीतरी दे
मी: जा हो आजी मला उशीर होतोय
म्हातारी: २ रुपये तरी दे रे..चहा तरी पिल.
मी: नाही हो आजी जा तुम्ही. (सिग्नल गेला आणि मी भरधाव निघालो)

(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन ४:
टौकीजवर पोहचलो, चिक्कार गर्दी होती. लोक आजकाल दसर्याला एव्हडे बाहेर जात नाही. कशी-बशी बाइक पार्किंगमधे लावली. मित्राची वाट पहात उभा होतो, तेव्हड्यात खालून कोणीतरी माझी पेंट ओढत होत. मी पहिले तर एक लाहान कळ्कट कपडे घातलेला मुलगा होता. हातात एक ताटली, त्यात ओळखु ना येणारे देव, त्यावर फूल वाहिलेली, अगरबत्ती लावलेली.
पोरगा: काका, काही द्या ना (माझी पेंट पुन्हा ओढत तो म्हणाला)
मी: नाही रे, काही नाही आहे..जा तू
पोरगा: द्या ना साहेब
मी: (ओरडून) जा ना सांगितले ना तुला काही नाही म्हणून…

तो पोरगा निघून गेला, पुन्हा दुसर्‍या कोणाची पेंट ओढायला

मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून……नाही आता मला आनद होत नव्हता…का जाणे कुणास ठाउक पण कुठेतरी चुकल्या सारखे वाटत होते.

मित्र-मन्डली आली, मी मात्र शून्यात पहात होतो. मी काही बोललो नाही. ते तिकीट फाडले आणि निघालो.
मित्र विचारात होते काय झाले?..रोबोट नाही पहायचा का?

मी: “तुम्हाला दिसत नसेल, पण मी माझयातल्या माणसाचा “भावनाशून्य रोबोट” झालेला पाहिला..आता ह्या सिनेमाची काही गरज नाही मला… “

पदवी कॉल्ड “बाबा”..

ज्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो शेवटी ३ सप्टेंबरला तो दिवस उजाडला. मी “बाबा” झालो. एका गोंडस जीवाने या धरतीवर आपल्या आगमना प्रीत्यर्थ “ट्याट्या” फोडून मला आणि सौला अनुक्रमे “बाबा” आणि “आई” अशा पदव्या बहाल केल्या.

मातीचा गणपती उठला आणि जिवंत मूर्ती घरात आली. सगळे अगदी खूश होते. माझ्या आई-बाबांना तर आभाळ ठेंगणे झाले होते. सगळ्या आप्त-सकीयांचे फोन येण्यास सुरुवात झाली.

“Congrats!! “.. “Hearly congratulations!! ” वैगरे वैगरे.

बऱ्याचं लोकांचा एक कॉमनं प्रश्न असायचा.. “मग आता काय बदल जाणवतोय? “..

“बराच.. पुण्याला बिलकुल पाऊस नाही हो.. आणि मुंबईत बघाना कसा धो-धो पडतोय”.. मी आपला निरागस उत्तर देत होतो.

“अहो.. तसे नाही हो.. बाबा झालात ना तुम्ही मग.. काय बदल वाटतोय? ”

आता या सद्ग्रुहस्ताला कोणीतरी बाबा झाले की दोन छोटीशी शिंग फुटतात किंवा अचानक केस पांढरे होतात किंवा मिशा येतात असे काही तरी सांगितले असावे. म्हणून २-३ वेळा विचारून खातरी करत असावे. आता मला सांगा मुलगा होऊन जेमतेम १-२ दिवस झालेले, त्यात असा कुठला बदल जाणवणार आहे हो?.. असो

आता या प्रश्नावर विचार केल्यावर असे वाटते की खरंच, काय बदल अपेक्षीत असला पाहिजे? चेहऱ्यावर ४० वर्षे जजची खुर्ची सांभाळून रिटायर्ड झाल्या सारखा गंभीर चेहरा करावा की आहे तसंच हसत खेळत राहावे.

माझ्यामते तर मला माझे बालपण या चिमुकल्या बरोबर पुन्हा जगायला आवडेल. बघूया कितपत जमतेय ते.. 🙂

या २३ तारखेला आमच्या लग्नाला २ वर्षे पूर्णं झालीत की हो… पण आम्ही दोघे अजून एकत्र मिळून साजराच करू शकलो नाही. म्हणजे बघा २००८ मध्ये पहिला वाढदिवस तेव्हा मी नुकताच एकटा अमेरिकेला आलो होतो आणि आता वापस जातो आहे तो पण ३० तारखेला.. म्हणजे हा पण हुकला. बायको तशी काही तक्रार करत नाही पण ह्याची व्याजासकट भरपाई करावी लागणार आहे हे नक्की.. 🙂 तशी ती आपणहून काही मागणार नाही.. पण काय आहे भविष्यातील युद्धात (युद्ध = एखादी महागडी, कधीही कामी न येणारी वस्तू मागणे ) वापरल्या जाणाऱ्या असंख्य शब्दरुपी शस्त्रात ह्या शस्त्राची भर पडायला नको.
“हो!! मी कधी काही मागितले आहे का तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाला? आता ही एकच गोष्ट मागते आहे ना.. ” असो

आत्ता बायकोला फोन केला तर “कोण आहे?? ” या टिपीकल पुणेरी स्वागत वाक्याने आमचा फोन घेतल्या गेला शिवाय “काय बाई लोक असतात.. रात्री-अपरात्री फोन करतात” हे फोन करण्याला ऐकू जाईल अशा स्वरात पुटपुटली. तिचे पण काही चूक नाही म्हणा. एकतर हा दिवस मला लक्षात राहील असा पुसटसाही विचार तीच्या मनात डोकावला नसेल (मोबाईल रिमाइंडर की जय!!! ) आणि मॅडम एकदा झोपल्या की बस!! लेडी-कुंभकर्ण आहे. 🙂 त्यात तिने रात्री १२:०० वाजता फोन घेतला हेच माझे भाग्य.

लग्नाला २ वर्षे पूर्णं झाले असले तरी अजून आमचा जेमतेम एखादं वर्षाचा संसार झाला असेल. त्यामुळे “चार लाईना” लिहीण्या इतपत अनुभव गाठीशी जमा झालेला नाही. तरी या एका वर्षात बरेच उतार-चढाव आलेत. “मुझे तुम याद करना ऑर मुझको याद आना तुम.. ” आणि “तुमसे जुदा होकर.. ” वैगरे गाणीपण झालीत. प्रेमरस, विरहरस, ध्वंदरस वैगरे रसपण झालेत.

बायकोतर्फे “भावनाशून्य दगड” ही उपाधी मला लग्नाच्या २-३ महीन्या नंतरच बहाल करण्यात आली आहे त्यामुळे जास्त काही लिहीत नाही. हो पण बायकोला एकच सांगावेसे वाटते आतापर्यंत जशी माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिलीस तशीच पुढेही राहा. आतापर्यंत समोर येईल त्या सुखद व दुःखद क्षणांना माझ्या सोबत हसत मुखाने सामोरे गेलीस तशीच कायम राहा… कारण तूच माझी शक्ती आहेस.. 🙂

आता इथेच थांबतो.. बायको साता समुद्रापलीकडे असल्यावर शब्दही सुचत नाही हो..

सेकंड इनींग..

Posted: जून 18, 2009 in विचार

Half century

Half century

सेकंड-इनींग म्हणा, हाफ-सेंचुरी म्हणा, की आणखीन काही, पण आज तीशीत प्रवेश केला आहे खरा. आमच्या बाबांच्या शब्दात सांगायचे झाले तर.. “३० वर्षाचा घोडा” झालोय.. असो. माझ्यामते ६० वर्षापर्यंतच आपण जगतो..नंतर आपण फक्त वाट पहात असतो..:-)

ह्या नीमित्याने काल आतापर्यंतचे आयुष्याचे रीकॅप डोळ्यापुढून गेले… अगदी आईचा हात धरून पहिले पाऊल टाकल्या पासून ते आईच्या हातात पहिला पगार टाकल्या पर्यंतचे. सगळे कसे भुरकणं निघून गेले.. असे वाटते आहे की आपण बरेच काही करायचे राहून गेले की या सगळ्या गडबडीत.

एक मात्र नक्की, आता ‘पहिले’ हा शब्द कशाच्याच पुढे जोडता येणार नाही.

पहिले पाऊल, पहिल्यांदा बोलायला लागलो असेल तेव्हा पहिली आईला मारलेली हाक, शाळेचा पहिला दिवस, पहिला मित्र, पास झाल्यावर बाबांकडून मिळालेली पहिली शाबासकी, पहिल्यांदा भिजलो असेल तो पाऊस, पहिला “क्रश”, कॉलेजचा पहिला दिवस, पहिल्यांदा केलेली दाढी, पहिली नोकरी, पहिला पगार, पहिल्यांदा चालवलेली बाइक, पहिलं प्रेम(माझ्या बायकोवरच.. 🙂 ), पहिले प्रमोशन आणि बरंच काही.. आता ते पहिलं राहणार नाही… 😦

फस्ट इनींग तर स्वतःला पीचवर सेट करण्यातच गेली.. आता सेकंड-इनींग मध्ये बरंच काही करायचं आहे अजून.. थोडंसं स्वतःसाठी पण जगायचे आहे… कामाच्या आणि इतर व्यापात बरचकाही मला आवडणार करायचं राहून गेलं आहे. पण आता ठरवलं आहे.. अभी थोडा अपने लीये भी जीना है. 🙂

विसरलेले पेन्सिल-स्केचींग पुन्हा सुरू करायचे आहे.. मराठी नाट्य-संगीताची जादू बाबांसोबत मनसोक्त अनुभवायची आहे.. गाणे शिकायचे आहे… एक-मेकांना बोटे न दाखवता चूक वाटत असलेली व्यवस्था स्वतः पुढाकार घेऊन सुधारायची आहे..

लिस्टमध्ये बरेच काही आहे.. तयारीतर सुरु केली आहे…बघूया कितपत जमते ते.. 🙂

आत्ताच ‘वट्पोर्णिमा’ झाली, बायकोचा फोन आला होता की ‘तुला अजुन सात जन्मासाठी बूक केले आहे..’ ..’अरे व्वा!! छान केलस’ यापेक्षा साधे व सरळ उत्तर माझ्याकडे नव्हते.

पण माझ्या मनात चलबिचल होत होती. मला तिला सांगावस वाटत होत की ‘बाई! आजकाल उद्याचा कोणी भरवसा देऊ शकत नाही आणि तु सात जन्माच्या गोष्टी काय करते आहेस.’

बर एक वेळेस आपण हे खर जरी मानल तर दर वर्षी का हे व्रत ठेवायचे? तुम्ही हे ७ जन्माचे बुकिंग करता आहात, ७ वर्षाचे नव्हे…मग एका जन्मात एक रीक्वेस्ट पुरे की..दर वर्षी का म्हणुन देवाला त्रास द्यायचा?

माझे एक स्पष्ट मत आहे. ज्या रुढी,चाली-रीती वैगरे जोपर्यत तुमच्या सदसद विवेकबुध्दीला पटत नाहित तो पर्यत त्या नुसत्या मानण्यात काही अर्थ नाही. रुढी,चाली-रीती मध्ये काळानुसार तुम्हाला जे योग्य वाटतील ते बदल करावे व त्याचे अवलोकन करावे.

माझ्या लग्नातलाच किस्सा तुम्हाला सांगतो..एका विधीत गुरुजींनी मला एका ताटात तांदुळ दिले व ७-८ देवांची नावे त्याच बरोबर माझ्या बायकोचे नाव लिहिण्यास सांगितले..आता पहिलेच ते नाव लिहीता-लिहीता माझी तारांबळ होत होती..त्या ताटाची साईज बघुन त्या ताटचे इतक्या नावे हिस्से होतील असे बिल्कुल वाटत नव्हते…मग मी गुरुजींचे लक्ष नाही हे बघुन एकावर एक नाव लिहिले..म्हटले कोणाला वाचायचे आहे?…पण गुरुजी माझ्या वरचठ्..’आता सगळी नावे वाचा!!’ आता झाली की पंचाईत…पहिलेच ते काय लिहीले आहे ते कळत नव्हते..आता वाचा म्हणे.

यातला विनोदाचा भाग सोडला तर मला या धार्मीक क्रियेमध्ये काही लॉजिक सापडले नाही. आपण अशाच कितीतरी गोष्टी फक्त त्या पुर्वीपासुन चालत आल्या आहेत म्हणुन आपण पाळत आलो आहोत.

पुर्वी जेवतांना ‘चित्रावली’ काठण्याचा प्रकार होत असे. ज्याची मुंज झाली आहे त्याने जेवायच्या आधी ताटाशेजारी ४-५ छोटे-छोटे घास टाकायचे आणि वर्तुळाकार पाणी फिरवायचे. आता माझ्या विचारशक्तीनुसार पुर्वी मातीची घरे असत्..खाली जमिन शेणाने सारवलेली असायची..त्यामुळे ताटाखालिल किटक,जंतु ताटात येउ नये म्हणुन हा सगळा अट्टाहास असावा. पण आता लोक खाली बसत नाहित्..शिवाय घरोघरी टाईल्स असतात..(टाईल्स लावल्या म्हणजे ते घर साफ असे नाही पण त्यातल्या त्यात साफ्)..त्यामुळे तुम्हीच सांगा या पध्दती तशाच सुरु ठेवायच्या का?

पण याचा अर्थ पुर्वीच्या सर्व गोष्टी “आउट डेटेड” झाल्या आहेत असे नाही. सोवळ्यातला स्वयंपाक म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘हायजेनिक कुकींग’ आणि अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या आपण आत्ताच्या सवयी प्रमाणे म्हणा किंवा सहुलती प्रमाणे म्हणा बदलु शकतो आणि अंगीकारु शकतो.