Archive for the ‘Uncategorized’ Category

दिवाळीच्या शुभेच्छा!!…

Posted: नोव्हेंबर 4, 2010 in Uncategorized

diwali-wishes

ZuZu Style:

Zuzu Style

Advertisements

ती…

Posted: ऑगस्ट 25, 2009 in Uncategorized

आज सकाळी मी काढलेले फोटो बघत होतो आणि अचानक फोटोमध्ये कोपऱ्यातील एका गोष्टीकडे लक्ष गेले. “ती” किती कैतुकाने माझ्याकडे बघत होती. तिला मला खूश बघून किती आनंद होत होता. ती आपला एकटेपणा जराही भासवत नव्हती. तिला कळून चुकले होते की आता माझा सहवास तिला क्वचितच लाभणार आहे. तरी ती खूश होती, हसत होती. माझ्या डोळ्या समोरून मागचे ७-८ वर्ष भारकानं सरकली.

पहिल्या भेटीतच मी तिचा फॅन झालो होतो. तेव्हाच ठरवले होते की हीच माझ्या “राह की हमसफर” होणार. पहिल्यांदा मी तिला जेव्हा घरी घेऊन आलो होतो तेव्हा सगळे कसे अगदी खूश झाले होते तिला पाहून. मी तर तिला सोबत घेतल्या शिवाय बाहेर पडायचोच नाही. तिने पण कधी कुरकूर केली नाही, रात्री-बेरात्री केव्हाही ती माझ्या सोबत बाहेर जायला हसत-खेळत तयार असायची. कधीही मला त्रास दिला नाही.

मागच्या वर्षी मी अमेरिकेला होतो त्यामुळे ती एकटी पडली होती. तिला कोणी वालीच नव्हता. तरी ती माझ्या वाटेकडे टक लावून बसली होती. मी आलो आणि तिची कळी खुलली. तिला मला पाहून इतका आनंद झाला की बस. तिला आभाळ ठेंगणे झाले होते.

पण… मला तिच्यातला बदल लक्षात आला. ती फार थकलेली दिसत होती. आता ती पहिल्यासारखी वेगाने फिरू शकत नव्हती. तिला बराच त्रास होत होता. ती फार थकली होती. आता मला सुद्धा आता तोडी अडचण व्हायला लागली होती.

पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. शेवटी एक दिवस मी नाइलाजाने करा घेऊन आलो. काल करा चे फोटो बघत असताना कोपऱ्यात उभी असलीली माझी “ती” बाइक अगदी एकाकी वाटत होती. माझ्याकडे ती केविलवाण्या नजरेने पाहत होती. माझा जीव एका क्षणासाठी का होईना पण कासावीस झाला. तिला जर खरंच बोलता आले असते तर?? तिने आपली अगतिकता अगदी ओरडून सांगितली असती का?.. पण न बोलता सुद्धा ती बरेच काही बोलून गेली 🙂

सोबत गाडीचा फोटो देतो आहे.. अणी कोपऱ्यात उभी आहे “ती”..
IMG_1406

चला आता-उद्या करता करता अमेरिकेला निरोप देण्याचा दिवस शेवटी उगवलाच. माणसाच्याही इच्छा परिस्थिती नुसार कशा बदलतात बघा.. मागच्या वर्षी याच वेळेस मी आमच्या मॅनेजरला भांडवून सोडले होते.. कधी पाठवता ऑन-साईटला म्हणून… आणि आता अक्षरशः हात जोडून म्हणावे लागले की बाबा जाऊ दे वापस मला.. 🙂

माणसाचा स्वभाव असतो ना बघा हातच सोडून पळत्याच्या मागे लागतो.. तसलं काही होत होत बघा.. म्हणजे बाहेरच जग मला जे ऑफर करत होत ते मला त्या वेळेच्या परिस्थितीत अगदी उलट असायचं.. असो सगळंच नेहमी जर आपल्या मनाप्रमाणे झालंतर शरद उपाद्धे आणि तो बेजान दारूवाला चे खायचे वांदे व्हायचे. या बेजान दारुवालाच्या आई-वडिलांनी त्याचे नाव ‘बेजान’ का ठेवले हेच कळले नाही.. त्याच्या अखंड शरीराकडे बघून(म्हणजे कॅमेऱ्यात बसेल तेव्हड्या) असे वाटत नाही की हा ‘बेजान’ आहे म्हणून.. असो.

मी जेव्हा अमेरिकेला आलो तेव्हा आमचे तारे तसे काही खास चमकत नव्हते. ज्या प्रोजेक्टसाठी आलो होतो त्याचे ‘गुण-गाणं’ अगदी क्लायंट पासून ते आमच्या सीनियर मॅनेजमेण्ट पर्यंत झाले होते.. मी जेव्हा येथे पोचलो तेव्हा एका मीटिंग नंतर आमच्या बॉसने व सीनियर मॅनेजरने गाडीत बसवून काय-काय ऐकवले होते म्हणून सांगू.. :-(.. आणि आता प्रोजेक्ट सक्सेस्फुल झाल्यावर याच सीनियर मॅनेजरने ‘चांगली कामगिरी’ म्हणून प्रेझेण्टेशन दिले होते. आमच्या नशिबी निखळ प्रशंसा नाहीच म्हणा.. 😦

मागच्या वर्षी माझी आणि अमेरिकेची इकॉनॉमीकल हालत सारखीच म्हणजे ‘हलाखीचीच’ होती. मी तर बरंच सावरलो आहे पण अमेरिकेला अजून वेळ आहे. अमेरिकेतल्या लोकांनी जर माझी किंवा भारतातल्या बहुतांश जनतेची “बचत” प्रवृत्ती जर अंगिकारली तर हे सुद्धा लवकर सावरतील… 🙂 काय तर म्हणे जो जास्त पैसे उधळतो (क्रेडिट हीस्ट्री) तो जास्त चांगला.. जाऊद्या मी काही अर्थशास्त्र विशारद नाही त्यामुळे या विषयावर न बोलणे बरे..

अमेरिकेकडून शिकण्यासारख्या बऱ्याचं चांगल्या गोष्टी आहेत. त्यांचा ड्रायव्हिंग सेन्स, त्यांची सामाजिक जाणीव, कायद्याला धरून वागणूक, स्वच्छता (कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी जा.. कुठेच तुम्हाला कचरा टाकलेला किंवा साचलेला सापडणार नाही आणि आश्चर्य म्हणजे आपले भारतीय पण सुतासारखे सरके वागतात.. आपल्या घरीच नेमके काय होते यांना काय म्हाइत.. 😦 ). या वादाच्या मुद्द्यात जास्त काही जात नाही… असो

या अमेरिका वारीत बरेच नवीन मित्र भेटले, जुन्या कॉलेज च्या मित्रांची पण गाठ-भेट झाली.. मजा आली. शिवाय हा “कट्टा” पण येथूनच सुरू केला. या आधुनिक कट्ट्यावर सुद्धा बरेच सगे-सोयरे भेटले आहेत. :-).. बऱ्याचं ऐतिहासिक घडामोडी झाल्यात.. ओबामा, मायकल जॅक्सन, बॉब मे, वैगरे वैगरे..

मी वापस येणार म्हणुन तिकडे घरी तर जय्यत तयारी सुरू आहे.. आपला मुलगा जणु कही एखादे युद्ध वैगरे जिंकून वापस येतो आहे अशा थाटात तयारी सुरू आहे.. मला तर काल चक्क आई आणि बायको चांगल्या नटून-थटून दारात आरती घेऊन उभ्या आहेत.. बाबा गच्चीवर जाऊन सगळ्या कॉलोनीत साखरेच्या पुड्या वाटता आहेत (बहुतेक हत्त्ती मिळाला नसेल).. आई मला “गाजर का हलवा” चे चांदीच्या चमच्याने घास भरवते आहे. (हो प्रत्तेक हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे मला सुद्धा गाजराचा हलवा आवडतो.. बहुतेक लहानपणी आईने शिरीष कणेकरांचे “मुलाला हिरो बनवण्याचे १० उपाय” फारच सीरियसली घेतले होते वाटते.. 🙂 पण थोडक्यात तिची इच्छा अधुरी राहिली.. असो ).. बायको “पाहा माझा नवरा किती मोठी कामगिरी फत्ते करून आला आहे” अशा आवेशात मिरवते आहे.. असले काही स्वप्न पडले होते.. 🙂

एकंदरीत “लाईफ-टाइम” एक्सपेरीयन्स होता… बायको सोबत घालवलेला डिसेंबर महिना तर अजूनही पूर्णं लक्षात आहे.. :-).. आता पुन्हा अमेरिकेला यायचा योग येईल असे वाटत तर नाही त्यामुळे “अखेरचा दंडवत” करून भारतवारी सुरू करतो.. 🙂

मां.. मै आरहा हु मां.. (धर्मेद्र स्टाइल उच्चारणं केले तर मजा येईल.. 🙂 )

काल महाजालावर भटकत असतांना काही इंटरेस्टींग चित्रे मीळाली.
ATT00000

ATT00001

ATT00002

and best of all….

ATT00003

Fabulous Las Vegas.. भाग – २

तिसरा दिवस:

रात्री बराच उशीर झाला होता आणि बरेच ड्रायव्हिंग झाले होते म्हणून जरा उशीराच उठलो. आज तसे दिवस काही करण्यासारखे नव्हतेच. आज फक्त अमित भाऊच्या भारी डिमांड वर भारतीय हॉटेलमध्ये जेवायला जायचे होते. १:३०-२:०० वाजता तयार होवून आम्ही निघालो ‘तांभा’ हॉटेल कडे. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही येथेच जेवलो होतो. येथे हेच एक हॉटेल फ़ेमस आहे पण आमचे ऐकले तर आभाळ कोसळेल असला काहीसा पावित्रा घेऊन दोघांची थोडी कुरकूर चाल्ली होती… ‘दुसरे कोणते हॉटेल आहे का? ‘ ‘तिथे नॉन-व्हेज चांगले मिळते का? ‘.. वैगरे चालले होते पण मी ‘ड्रायव्हर कोण आहे? ‘ या एका प्लस पॉंईंटवर त्यांना तिथे घेऊन चाललो होतो.

या हॉटेलमध्ये दुपारी बुफे असतो. (‘चुपके-चुपके’ सिनेमातल्या धर्मेद्रला जसे इंग्लिश मध्ये काही निरागस शंका होत्या त्याप्रमाणेच या बुफे चे स्पेलिंग buffet असे का आहे? हा मला ना सुटणारा प्रश्न आहे.. असो). जेवण करून आम्ही तिघे तृप्त झालो होतो आणि डोळे उघडे ठेपण्यासाठी बरेच कष्ट पडत असल्याने आणि आज स्ट्रीपवर फेर-फटका मारायचा होता त्यामुळे बरेच फिरावे लागणार होते हे ही एक कारण होतेच म्हणून आम्ही एक २-३ तास ताणून द्यायचे ठरवले.

साधारण ८:०० वाजता आमची वरात पुन्हा निघाली. ‘लास-वेगास अपनी पुरी जवानी पे था’.. लक्षावधी दिवे झगमगत होते. सगळा देखावा अगदी मंत्रमुद्ध करून टाकणारा होता. आम्ही एक-एक करत सगळे कॅसिनो पालथे घालायला सुरुवात केली. तिथले झगमगाट आणि जुगार पाहिल्यावर ‘आर्थिक मंदी’ ही अमेरिकेत नसून दुसऱ्या कुठल्यातरी देशात आहे असे वाटते. पैसा नुसता वाहतं असतो. आमचे थीरू अण्णा फुल फॉर्ममध्ये होते.. त्याला एकदातरी खेळायचे होते.. पण मग सगळ्या टेबलची लिमिट $३०-$५० पेक्षा कमी नव्हती त्यामुळे आमच्यापैकी कुणीच तयार होत नव्हत. व्हेनेशियन, मिराज, बेलाजीयो फाऊंटन, नुऑर्क-नुऑर्क, एम. जी. एम, सिजर पॅलेस.. वैगरे वैगरे कॅसिनो कॅमेऱ्यात बंद करण्याचे काम नवोदित फोटोग्राफर अमित चोखपणे पार पाडतं होता. एक आहे.. आपण भारतीय आणि दुसरे चिंकी म्हणजे चायनिज, जॅपनीज, कोरीयन… सगळे (आमच्या बाबांच्या सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ज्यांच्या नाकावरून गाडी गेलेली असते ते) काही असो आपली एकच-एक पोझ देत फोटो काढत असतो. फक्त मागचा सीन बदलतो बाकी फोटोतला माणूस तीच स्माईल आणि तीच पोझ घेऊन उभा असतो… (मागच्या पोस्टमधील माझे फोटो बघून तुम्हाला याचा अंदाज येईल… 🙂 )

३ तास फीर-फीर करून आता पाय तुटायला आले होते. १ वाजेपर्यंत आमचे बहुदा सगळे कॅसिनो बघून झाले होते… मग आम्ही ‘बॅक टू पॅव्हेलीयन’ म्हणत आम्ही हॉटेलला परतीची बस पकडली.

परतीचा दिवस :

सोमवारी ११ वाजेच्या आत आम्हाला हॉटेलमधून चेक-आऊट करायचे होते. टी. व्ही. वरून १०:०० वाजता चेक-आऊट केले. (दचकू नका.. लास-वेगास ला फार गर्दी असते त्यामुळे सगळ्या हॉटेलमध्ये अशा बऱ्याचं फॅसीलीटीच त्यांना ठेवाव्या लागतात.. असो) सगळं आटपून आम्ही ११ वाजता मॅडम टूसाडो म्युझियममध्ये पोहचलो. मी मागच्या खेपेस बघितला असल्याने या दोघांना आत सोडून मी मस्त कारमध्ये लतादीदीला शाल देऊन बसवले(सरळ शब्दात सी. डी. लावली.. ) आणि जरा पहुडलो.

१२-१२:३० वाजता आम्ही जादुई नगरीची रजा घेऊन निघालो. खरंतर पोहचायला ५-५:३० तास लागणार होते पण त्या दिवशी नेमका भयंकर ट्रॅफिक जाम होता आणि आम्ही रात्री ८:३० वाजता मुंगीच्या पावलाने घरी पोहचलो. एव्हडा उशीर झाला पण प्रवासात मजा केली. गाणे, गेम्स वैगरे करत-करत वेळ कसा गेला कळलेच नाही.

एका जुन्या हिंदी गाण्याप्रमाणे सांगावे वाटते..

‘जीवन मे एक बार आना लास-वेगास… ‘

Las-Vegas

Fabulous Las Vegas.. भाग – १

Fabulous Las Vegas.. भाग – २

“ज्या देशात माझ्या देशबांधवांना अमानवी वागणूक मिळत आहे त्या देशातील डॉक्‍टरेट पदवी मिळविण्यास माझी सदसद्विवेकबुद्धी तयार होणार नाही,” अशी सडेतोड घोषणा अमिताभ बच्चनने आपल्या ब्लॉगवर केली आणि ऑस्ट्रेलियातील क्वीन्स लॅंड विद्यापीठाकडून मिळणारी डॉक्‍टरेट नाकारली. याबद्दल आपणा सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटला पाहिजे.

एवढेच नव्हे, तर अमिताभचा हा निर्णय एकट्याचा नसून, त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा करून, त्यांचा सल्ला घेऊन त्याने हा निर्णय घेतला आहे. म्हणून केवळ अमिताभच नव्हे, तर सर्व बच्चन कुटुंबीयांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

सैजन्यः सकाळ

ले चले हम इंडीया जान-ओ-तन् साथीयो..
अब तुम्हारे हवाले किचन साथियो..

जस् जसे माझे इंडीयाला जाण्याचे दीवस जवळ् येता आहेत्,तस् तसे मझे कुठल्याही कामात मन लागत् नाही आहे.’स्वयंपाक’ हे त्यातलेच एक् काम.३० जुन ला अजुन् महिनाभर् अवकाश् आहे तरी मला आत्तापासुनच जायचे वेध् लागले आहेत्.म्हणुन ठरवले की किचन मधुन् सुध्धा आपला पाय काठता घ्यावा.

एक् तर माझ्या हातचे खाउन्-खाउन् मलाच कंटाळा आला आहे.(मला तर् आईचे फार् कैतुक वाटते बुवा..ती कशीकाय ३०-३५ वर्ष् झाले न कुरकुर करता स्वयंपाक करतेय्..मला तर् एका वर्षातच कंटाळा आला आहे.)दुसरे म्हणजे लक्ष लागत् नाही आहे म्हटल्यावर् उगाचच जेवण् फसले म्हणजे आपल्या सोबात् आमच्या रुम मेटस् ची पण् पंचाईत् होणार.मग हार्टवर्(रु..हु..द..या..हा..व..ह..र.. लीहीणार् होतो पण फार् वेळ् लढल्यावर् पण् काही जमले नाही..असो)दगड ठेउन निर्णय घेतला की..’जहापना आजसे स्वयंपाक घर मे कदम नही ठेवेंगे’..अशा आवेशात् विंगेतुन(बेडरुम) येतांना मी वाक्य फेकले..(रुम मेटस् ना माझा आवेश पाहुन मी कमरेतुन् तलवार् वैगरे काठतो की काय असे वाटले..)

आता माझ्या बटालीयन ने माघर् घ्यायचे ठरवल्यावर..ज्या बटालीयन ने ‘चिकन खिचडी’ चा प्रयोग केला होता त्यांनाच किचनचा मोर्चा सांभाळावा लागणार् आहे.

सगळ्यांचे म्हणणे आहे की अजुन् तर् महीना आहे जायला..आत्ता पासुनच काय् उडतो आहेस्?..पण् खर सांगायचे तर् माझे शरिर जरी येथे असले तरी माझे मन कधिच् इंडीयाला पोहोचले आहे.

आता नविन बटालीयनला मोर्चा सांभाळुन एक् दीवस झाला आहे…तेव्हड्यातच त्यांनी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्षण सुरु केले आहे.काल शनिवार् होता त्यामुळे सकाळी जरा पोहे खाण्याचा मुड होता..तर् “पोहे करता का?” या साध्या प्रष्णाला ‘पोहे करता येत नाहीत’..असे उत्तर् देउन्..हेडन जसा सलिल अंकोलाच्या फुलटॉस् ला एका हातानेच बॉड्रीबाहेर् फेकेन तसा माझा प्रष्ण टोलावला.सलिल अंकोला मला अजुनही आठवतो म्हणुन माझा शाल-श्रीफळ(पुण्यात येण्या अगोदर श्रीफळ हे सिताफळ आणी रामफळ या दोघांच्या मधले फळ् असावे असा माझा समज होता..)देउन लाकडीपुलावर् सत्कार वैगरे करु नका..कारण या वेळेला मला सलिल अंकोला पेक्षा अधिक कमकुवत् गोलंदाज मिळाला नाही म्हणुन. (आयला..’गोलंदाज’..मराठी सुधरतेय माझे..माझे मराठीचे देव गुरुजींना किती आनंद् झाला असता..पण चांगले दीवस पहाणे त्यांच्या नशिबातच नव्हते..असो).

आता पहिल्याच दिवशी अशी सुरुवात् झाली आहे..देखते है..आगे-आगे क्या होता है?…