Posts Tagged ‘कुल्फी’

कुल्फी

कुल्फी

आज इडींयन स्टोअर्समध्ये चक्कर मारतानां एके ठीकाणी कुल्फी दिसली. मला ते बघुन खुप हेवा वाटला कारण मी लहानपणी ज्या भैया आणी करीम चाचा कडुन कुल्फी घ्यायचो, त्या कुल्फी पेक्षा ही कुल्फी जरा नशिबवान होती.

कुल्फी एका छानश्या प्लास्टिकच्या कव्हरमध्ये ठेवली होती. वेगवेगळ्या फ्लेवर नुसार त्या कव्हरचा रंग होता. मॉगो कुल्फी केशरी रंगाच्या कव्हरमध्ये, पीश्ता कुल्फी लाईट ग्रीन रंगाच्या कव्हरमध्ये होती. आईस्क्रिम ठेवतात तसल्याशा फ्रीजरमधे ती आरामात लोळत होती.

ते बघुन मला आमच्या कुल्फीवाले करीम चाचाची आठवण झाली. त्याच्याकडे असे महागडे फ्रीजर नव्हते, एका हातगाडीवर एक भलेमोठे मडके असायचे, त्या मडक्याचे सगळे शरीर एका पांढर्या कपड्याने झाकलेले असायचे. त्याला पांढरे म्हणणे म्हणजे विनोद कांबळी ला गोरे म्हटल्या सारखे आहे..असो

त्या हातगाडीला वेगवेगळे रंग दीलेले असायचे. शिवाय २-३ नट्-नट्यांचे कुल्फी खातांनाचे चित्र असायचे. बर ते चित्र २-डी आहे असे वाटत नव्हते आणी ३-डी च्या तर जवळ्पास सुध्धा भटकत नव्हते. त्या चित्रातले डोळे हे ‘लुकिंग टु लंडन अँड टॉकींग टु टोकीयो’ असे होते. मला तर किती दिवस ते चित्र कोणत्या तरी नटीचे वाटत होते..मग नंतर विचारल्यावर करीम चाचा ने सांगितले के ‘तो’ ‘अमिताभ’ आहे म्हणुन. अमिताभ ने हे पाहिले असते तर बाकिचे सगळे सिनीमे त्याने बुरखा घालुनच केले असते..असो. त्या हातगाडीवर चारही बाजुने आरसे आसयचे. आणी वरती छप्परावर एक घंटी असायची. ‘ट्ण!!ट्ण!!’ असा सिग्नल मिळाला की सगळी बच्चा कंपनी जमा होत असे.

२५ पैसे, आठ आणे, १ रुपया, २ रुपया अशा अनेक कुल्फ्या त्याच्याकडे असायच्या. टप्परांचे रिबेट लावलेले कोन आणी त्यामध्ये खुपसलेली काडी अशी ती कुल्फी तो त्या मटक्या मधुन तो काधत असे. जितका मोठा कोन तितके जास्त पैसे. त्याच्याकडे ठरलेले फ्लेवर असायचे ‘मावा’ आणी ‘पिस्ता’ बस!!..त्या पिस्ता कुल्फीत मला कधिच पिस्ता भेटला नाही. हा कुल्फीवाला पण फक्त उन्हाळ्यातच दिसत असे.

आत्ताही ऑफिसमध्ये असतांना घंटी ऐकु आली की बाहेर धुम ठोकावीशी वाटते.

मित्राच्या हाकेने मी भानावर आलो. मोह आवरला नाही म्हणुन मी ती आरामात लोळत असलेली कुल्फी $१.९९ ला म्हणजे जवळ्-जवळ ९० रुपयाला ती कुल्फी घेतली. पण खर सांगतो तीला त्या आठ आण्याच्या कुल्फीची सर नव्हती..

Advertisements