Posts Tagged ‘गुरुजीं’

आत्ताच ‘वट्पोर्णिमा’ झाली, बायकोचा फोन आला होता की ‘तुला अजुन सात जन्मासाठी बूक केले आहे..’ ..’अरे व्वा!! छान केलस’ यापेक्षा साधे व सरळ उत्तर माझ्याकडे नव्हते.

पण माझ्या मनात चलबिचल होत होती. मला तिला सांगावस वाटत होत की ‘बाई! आजकाल उद्याचा कोणी भरवसा देऊ शकत नाही आणि तु सात जन्माच्या गोष्टी काय करते आहेस.’

बर एक वेळेस आपण हे खर जरी मानल तर दर वर्षी का हे व्रत ठेवायचे? तुम्ही हे ७ जन्माचे बुकिंग करता आहात, ७ वर्षाचे नव्हे…मग एका जन्मात एक रीक्वेस्ट पुरे की..दर वर्षी का म्हणुन देवाला त्रास द्यायचा?

माझे एक स्पष्ट मत आहे. ज्या रुढी,चाली-रीती वैगरे जोपर्यत तुमच्या सदसद विवेकबुध्दीला पटत नाहित तो पर्यत त्या नुसत्या मानण्यात काही अर्थ नाही. रुढी,चाली-रीती मध्ये काळानुसार तुम्हाला जे योग्य वाटतील ते बदल करावे व त्याचे अवलोकन करावे.

माझ्या लग्नातलाच किस्सा तुम्हाला सांगतो..एका विधीत गुरुजींनी मला एका ताटात तांदुळ दिले व ७-८ देवांची नावे त्याच बरोबर माझ्या बायकोचे नाव लिहिण्यास सांगितले..आता पहिलेच ते नाव लिहीता-लिहीता माझी तारांबळ होत होती..त्या ताटाची साईज बघुन त्या ताटचे इतक्या नावे हिस्से होतील असे बिल्कुल वाटत नव्हते…मग मी गुरुजींचे लक्ष नाही हे बघुन एकावर एक नाव लिहिले..म्हटले कोणाला वाचायचे आहे?…पण गुरुजी माझ्या वरचठ्..’आता सगळी नावे वाचा!!’ आता झाली की पंचाईत…पहिलेच ते काय लिहीले आहे ते कळत नव्हते..आता वाचा म्हणे.

यातला विनोदाचा भाग सोडला तर मला या धार्मीक क्रियेमध्ये काही लॉजिक सापडले नाही. आपण अशाच कितीतरी गोष्टी फक्त त्या पुर्वीपासुन चालत आल्या आहेत म्हणुन आपण पाळत आलो आहोत.

पुर्वी जेवतांना ‘चित्रावली’ काठण्याचा प्रकार होत असे. ज्याची मुंज झाली आहे त्याने जेवायच्या आधी ताटाशेजारी ४-५ छोटे-छोटे घास टाकायचे आणि वर्तुळाकार पाणी फिरवायचे. आता माझ्या विचारशक्तीनुसार पुर्वी मातीची घरे असत्..खाली जमिन शेणाने सारवलेली असायची..त्यामुळे ताटाखालिल किटक,जंतु ताटात येउ नये म्हणुन हा सगळा अट्टाहास असावा. पण आता लोक खाली बसत नाहित्..शिवाय घरोघरी टाईल्स असतात..(टाईल्स लावल्या म्हणजे ते घर साफ असे नाही पण त्यातल्या त्यात साफ्)..त्यामुळे तुम्हीच सांगा या पध्दती तशाच सुरु ठेवायच्या का?

पण याचा अर्थ पुर्वीच्या सर्व गोष्टी “आउट डेटेड” झाल्या आहेत असे नाही. सोवळ्यातला स्वयंपाक म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘हायजेनिक कुकींग’ आणि अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या आपण आत्ताच्या सवयी प्रमाणे म्हणा किंवा सहुलती प्रमाणे म्हणा बदलु शकतो आणि अंगीकारु शकतो.

Advertisements