Posts Tagged ‘बायको’

Two thousand prints, around 10,000 shows, international technicians and makeup artists, award winning sound engineering and music – as the extravagant 200-crore saga unfolds this weekend – it will also shatter the myths of ‘small market, small budget’. The notions of ‘Tamil cinema being a small market and hence there are restrictions with regard to budget’ will be flushed down the drain as Endhiran releases to a whopping number of 600 screens in Chennai city alone.

 आता तुम्हीच सांगा असला जबरदस्त सिनेमा सोडणार आहे का?

तिकिटांसाठी १-२ मित्राकडे चौकशी केली, तर काळाले की १ तासात सर्व तिकिटे विकल्या गेली. हीच कहाणी सगळीकडे होती. मी पण मग जिद्दीला पेटलो. काही करून तिकीट मिळवायचेच. ४-५ कॉन्टॅक्ट कडे हात-पाय जोडुन विनंती केली, तेव्हा कुठे ब्लॅकमधे ५०० रुपयात तिकीट मिळवले. (बायकोला जर हे कळले तर त्या रुपयात करू शकणार्‍या १०० गोष्टी ऐकवल्या असत्या ..असो)
शेवटी तो दीवस उजाडला. आज महानायक रजनीकांत चा सिनेमा बघणार होतो. दुपारी १२:०० चा शो होता, म्हटल उशीर नको म्हणून १०:०० वाजताच घरातून निघालो. हो म्हटल नेमक नाहीतर ट्रॅफिक मधे अडकायच आणि रजनी दा ची एंट्री जायची 🙂

सीन १:
कामवाली बाई: साहेब, आज थोडे पैसे उधार हवे होते
बाबा: किती?
कामवाली बाई: १०० रुपये साहेब
बाबा: प्रसाद, बाईना १०० रुपये दे तर.
मी: बाई, कशाला हवे आहेत पैसे? मझयाकडे नाही आहेत सध्या.
कामवाली बाई: साहेब, पोराची शाळेची फी भरायची आहे.
मी: नाही.
(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन २:
बहादूर (गेट-कीपर): सहाबजी, वो मेरा तबियत खराब है काल से…
मी: हा तो डॉक्टर के पास जावो ना..मेरा डोका क्यु खाता है?
बहादूर: सहाबजी, १०० रुपये मिल जाता तो दवाई लेके आयेगा साहबजी.
मी: अभी नही है..जावो तुम.
(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन ३:
ट्रॅफिक सिग्नलवर बाइक थांबवली. रस्त्याचा बाजूला उभी असलेली एक भिकारी म्हातारी मझयाकडे आली.
म्हातारी: पोरा, काल पासून अन्न नाही रे पोटात. काहीतरी दे
मी: जा हो आजी मला उशीर होतोय
म्हातारी: २ रुपये तरी दे रे..चहा तरी पिल.
मी: नाही हो आजी जा तुम्ही. (सिग्नल गेला आणि मी भरधाव निघालो)

(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन ४:
टौकीजवर पोहचलो, चिक्कार गर्दी होती. लोक आजकाल दसर्याला एव्हडे बाहेर जात नाही. कशी-बशी बाइक पार्किंगमधे लावली. मित्राची वाट पहात उभा होतो, तेव्हड्यात खालून कोणीतरी माझी पेंट ओढत होत. मी पहिले तर एक लाहान कळ्कट कपडे घातलेला मुलगा होता. हातात एक ताटली, त्यात ओळखु ना येणारे देव, त्यावर फूल वाहिलेली, अगरबत्ती लावलेली.
पोरगा: काका, काही द्या ना (माझी पेंट पुन्हा ओढत तो म्हणाला)
मी: नाही रे, काही नाही आहे..जा तू
पोरगा: द्या ना साहेब
मी: (ओरडून) जा ना सांगितले ना तुला काही नाही म्हणून…

तो पोरगा निघून गेला, पुन्हा दुसर्‍या कोणाची पेंट ओढायला

मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून……नाही आता मला आनद होत नव्हता…का जाणे कुणास ठाउक पण कुठेतरी चुकल्या सारखे वाटत होते.

मित्र-मन्डली आली, मी मात्र शून्यात पहात होतो. मी काही बोललो नाही. ते तिकीट फाडले आणि निघालो.
मित्र विचारात होते काय झाले?..रोबोट नाही पहायचा का?

मी: “तुम्हाला दिसत नसेल, पण मी माझयातल्या माणसाचा “भावनाशून्य रोबोट” झालेला पाहिला..आता ह्या सिनेमाची काही गरज नाही मला… “

Advertisements

या २३ तारखेला आमच्या लग्नाला २ वर्षे पूर्णं झालीत की हो… पण आम्ही दोघे अजून एकत्र मिळून साजराच करू शकलो नाही. म्हणजे बघा २००८ मध्ये पहिला वाढदिवस तेव्हा मी नुकताच एकटा अमेरिकेला आलो होतो आणि आता वापस जातो आहे तो पण ३० तारखेला.. म्हणजे हा पण हुकला. बायको तशी काही तक्रार करत नाही पण ह्याची व्याजासकट भरपाई करावी लागणार आहे हे नक्की.. 🙂 तशी ती आपणहून काही मागणार नाही.. पण काय आहे भविष्यातील युद्धात (युद्ध = एखादी महागडी, कधीही कामी न येणारी वस्तू मागणे ) वापरल्या जाणाऱ्या असंख्य शब्दरुपी शस्त्रात ह्या शस्त्राची भर पडायला नको.
“हो!! मी कधी काही मागितले आहे का तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाला? आता ही एकच गोष्ट मागते आहे ना.. ” असो

आत्ता बायकोला फोन केला तर “कोण आहे?? ” या टिपीकल पुणेरी स्वागत वाक्याने आमचा फोन घेतल्या गेला शिवाय “काय बाई लोक असतात.. रात्री-अपरात्री फोन करतात” हे फोन करण्याला ऐकू जाईल अशा स्वरात पुटपुटली. तिचे पण काही चूक नाही म्हणा. एकतर हा दिवस मला लक्षात राहील असा पुसटसाही विचार तीच्या मनात डोकावला नसेल (मोबाईल रिमाइंडर की जय!!! ) आणि मॅडम एकदा झोपल्या की बस!! लेडी-कुंभकर्ण आहे. 🙂 त्यात तिने रात्री १२:०० वाजता फोन घेतला हेच माझे भाग्य.

लग्नाला २ वर्षे पूर्णं झाले असले तरी अजून आमचा जेमतेम एखादं वर्षाचा संसार झाला असेल. त्यामुळे “चार लाईना” लिहीण्या इतपत अनुभव गाठीशी जमा झालेला नाही. तरी या एका वर्षात बरेच उतार-चढाव आलेत. “मुझे तुम याद करना ऑर मुझको याद आना तुम.. ” आणि “तुमसे जुदा होकर.. ” वैगरे गाणीपण झालीत. प्रेमरस, विरहरस, ध्वंदरस वैगरे रसपण झालेत.

बायकोतर्फे “भावनाशून्य दगड” ही उपाधी मला लग्नाच्या २-३ महीन्या नंतरच बहाल करण्यात आली आहे त्यामुळे जास्त काही लिहीत नाही. हो पण बायकोला एकच सांगावेसे वाटते आतापर्यंत जशी माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिलीस तशीच पुढेही राहा. आतापर्यंत समोर येईल त्या सुखद व दुःखद क्षणांना माझ्या सोबत हसत मुखाने सामोरे गेलीस तशीच कायम राहा… कारण तूच माझी शक्ती आहेस.. 🙂

आता इथेच थांबतो.. बायको साता समुद्रापलीकडे असल्यावर शब्दही सुचत नाही हो..

आत्ताच ‘वट्पोर्णिमा’ झाली, बायकोचा फोन आला होता की ‘तुला अजुन सात जन्मासाठी बूक केले आहे..’ ..’अरे व्वा!! छान केलस’ यापेक्षा साधे व सरळ उत्तर माझ्याकडे नव्हते.

पण माझ्या मनात चलबिचल होत होती. मला तिला सांगावस वाटत होत की ‘बाई! आजकाल उद्याचा कोणी भरवसा देऊ शकत नाही आणि तु सात जन्माच्या गोष्टी काय करते आहेस.’

बर एक वेळेस आपण हे खर जरी मानल तर दर वर्षी का हे व्रत ठेवायचे? तुम्ही हे ७ जन्माचे बुकिंग करता आहात, ७ वर्षाचे नव्हे…मग एका जन्मात एक रीक्वेस्ट पुरे की..दर वर्षी का म्हणुन देवाला त्रास द्यायचा?

माझे एक स्पष्ट मत आहे. ज्या रुढी,चाली-रीती वैगरे जोपर्यत तुमच्या सदसद विवेकबुध्दीला पटत नाहित तो पर्यत त्या नुसत्या मानण्यात काही अर्थ नाही. रुढी,चाली-रीती मध्ये काळानुसार तुम्हाला जे योग्य वाटतील ते बदल करावे व त्याचे अवलोकन करावे.

माझ्या लग्नातलाच किस्सा तुम्हाला सांगतो..एका विधीत गुरुजींनी मला एका ताटात तांदुळ दिले व ७-८ देवांची नावे त्याच बरोबर माझ्या बायकोचे नाव लिहिण्यास सांगितले..आता पहिलेच ते नाव लिहीता-लिहीता माझी तारांबळ होत होती..त्या ताटाची साईज बघुन त्या ताटचे इतक्या नावे हिस्से होतील असे बिल्कुल वाटत नव्हते…मग मी गुरुजींचे लक्ष नाही हे बघुन एकावर एक नाव लिहिले..म्हटले कोणाला वाचायचे आहे?…पण गुरुजी माझ्या वरचठ्..’आता सगळी नावे वाचा!!’ आता झाली की पंचाईत…पहिलेच ते काय लिहीले आहे ते कळत नव्हते..आता वाचा म्हणे.

यातला विनोदाचा भाग सोडला तर मला या धार्मीक क्रियेमध्ये काही लॉजिक सापडले नाही. आपण अशाच कितीतरी गोष्टी फक्त त्या पुर्वीपासुन चालत आल्या आहेत म्हणुन आपण पाळत आलो आहोत.

पुर्वी जेवतांना ‘चित्रावली’ काठण्याचा प्रकार होत असे. ज्याची मुंज झाली आहे त्याने जेवायच्या आधी ताटाशेजारी ४-५ छोटे-छोटे घास टाकायचे आणि वर्तुळाकार पाणी फिरवायचे. आता माझ्या विचारशक्तीनुसार पुर्वी मातीची घरे असत्..खाली जमिन शेणाने सारवलेली असायची..त्यामुळे ताटाखालिल किटक,जंतु ताटात येउ नये म्हणुन हा सगळा अट्टाहास असावा. पण आता लोक खाली बसत नाहित्..शिवाय घरोघरी टाईल्स असतात..(टाईल्स लावल्या म्हणजे ते घर साफ असे नाही पण त्यातल्या त्यात साफ्)..त्यामुळे तुम्हीच सांगा या पध्दती तशाच सुरु ठेवायच्या का?

पण याचा अर्थ पुर्वीच्या सर्व गोष्टी “आउट डेटेड” झाल्या आहेत असे नाही. सोवळ्यातला स्वयंपाक म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘हायजेनिक कुकींग’ आणि अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या आपण आत्ताच्या सवयी प्रमाणे म्हणा किंवा सहुलती प्रमाणे म्हणा बदलु शकतो आणि अंगीकारु शकतो.

सौ.चा वाढदिवस..

आज् २९ मे..म्हणजे आमच्या सौ.चा वाढदिवस.

तुम्ही म्हणत् असाल्..’वा!! काय् छान नवरा आहे’ बायकोचा वाढदिवस ह्याच्या बरोब्बर् लक्क्षात् आहे.कस काय जमते तुम्हाला?

खर् सांगायच् झाल तर् तुम्हाला फार् मेहनत घ्यावी लागते,फार् घोकमपट्टी केल्यावर् हे लक्क्षात् रहातेय.

मोबाईलमधे,Personal laptop मधे, Office computer मधे reminders टाकुन ठेवले आहेत् (ज्या लोकांनी ह्या reminders चा शोध लावला आहे तयांना समस्थ नवरा जमाती तर्फे कोटी-कोटी धन्यवाद्..असो). झालच् तर् घरात् असतील्-नसतील् तेव्हड्या सगळ्या Calendar वर् २९ मे कोरुन् ठेवली आहे.माझ्या मेंदुने जर् मला ऐनवेळी दगा दिलाच तर् हे सगळे मला आठवण् करुन् देतिल्.

कधी-कधी तर मला अचानक् रात्री जाग् येते..असे वाटते की मी बायकोचा वाढदिवस वीसरलो की काय्..असो.तर् सांगायचा मुद्दा असा की तुम्ही दुसरे काहीही विसरा पण बायकोचा वाढदिवस विसरु नका.जगातले सर्व् गुन्हे माफ् पण हा गुन्हा नाही.

तुम्ही विचार् करत असाल् की..’हात् तिच्या ऐवठच् ना!!’,पण नुसता वाढदिवस लक्क्षात् ठेउन् चालत् नाही.तर् दोघांनी ‘पहील्यादा’ केलेल्या सगळ्या गोष्टी लक्क्षात् असाव्या लागतात्.

१. पहीली भेट् ‘कुठे’ झाली..जागा बीनचुकता दाखवता आली पाहिजे..उदा: hotel मध्ये कुठला टेबल् होता हे बीनचुक दाखवता आहे पाहिजे. आठवत् नसेल् तर् बायकोशी हुज्जत् घालु नका..अमेरिका जेव्हड्या अचुकपणे ओसामालाही शोधु शकणार् नाही..तेव्हड्या अचुकपणे बायको तो टेबल शोधुन् काधेल्.

२. पहीली भेट् ‘कधी’ म्हणजे वेळ् लक्क्षात् असणे आवश्यक.तुम्ही जर उशीरा(१-२ मीनीटे पेक्षा जास्त) पोहोचले असाल्(ह्याचीच् शक्यता जास्त आहे) तर् दर् वेळेस् त्याचा उल्लेख् करुन् माफी मागावी आणी सौ जर् उशीरा(१-२ तासापेक्षा जास्त) आल्या असतील तर् त्याचा उल्लेख टाळावा

३.पहीली भेट् ‘कशी’ झाली..म्हणजे भेट कोणी घडउन् आणली…वैगरे (शक्यतो बायकोच्या माहेरच्या व्यक्तीला प्राधान्य द्यावे..असो)

४. यापेक्षा महत्वाचे म्हणजे सौ. ने पहील्या भेटीत काय् घातले होते..त्याचा रंग् काय होता. हे सगळे लक्क्षात् असणे आवश्यक.

तुम्ही म्हणाल् या ४ गोष्टीचा वाढदिवसाशी काय् संबंध?..माझे एक् स्पष्ट मत आहे..”माणसाने युध्धासाठी सदैव् तयार् रहावे.” कोणावर् कधी कशी वेळ् येईल् सांगता येत् नाही..असो.

तुम्हाला वाटत् असेल् झाला गढ फत्ते..पण् अजुन् महत्वाचा भाग् म्हणजे..”gift”.

तर् gift च्या बाबतीत् खाली नमुद् केलेल्या गोष्टी टाळाव्यात्.

१. मागील कुठल्यातरी वाढदिवशी दिलेली भेटवस्तु पुन्हा देणे..(तुम्हाला आठवत् नसले तरी “शत्रु” प़क्षाकडे याची पुर्ण् नोंद् आणी पुरावा असतो.)

२. ‘अग!! मागच्या महिन्यात् तर् साडी घेतली होती, म्हणुन् यावेळेस् नाही आणली’..हे वाक्य कुकिंग गँस् लीक् झाल्यावर् काडीपेटी जेव्हड्या लवकर् आग् लाउ शकते..त्यापेक्षा कीत्तेक पटीने लवकर् आग् लाउ शकते.

३. ‘अग!! घाई-गडबडीत् वीसरलो..आत्ता जातो..'(…देव् तुमच्या आत्म्याला शांती देवो..)

आता एव्हडे सगळे करुनही जर् तुम्ही वाढदिवस् विसरलात् तर् घाबरु नका.”शत्रु” प़क्ष तुम्हाला hint द्वारे एक् संधी देणार्.फक्त तुम्हाला ती ओळखता आली पाहीजे.
खाली नमुद् केलेल्या सर्व् वाक्याचा अथॅ “तुम्ही माझा वाढदिवस् विसरले आहात्” असा होतो.
१. ‘आज् आपण् बाहेरच् जेवायला जाउ या.तुम्ही लवकर या.’
२. ‘आज् जरा लवकर् या ना office मधुन्’
३. ‘आज् सकाळ् पासुन् कीती फोन् येताय्..कंटाळा आला बाई फोन् घेउन्-घेउन्’
वैगरे..वैगरे…वैगरे…

असो..माझा उपदेश् पुरे झाला..सगळ्या विसरभोळ्या नवरेमंडळीना ..All the best!!!

पु.ल. देशपांडे नी दीलेला “उपदेश्” नमुद् करतो आहे

डॉ. श्रीरंग आडारकर यांचे चिरंजीव अशोक आडारकर यांना त्यांच्या विवाहानिमित्त पु. ल. देशपांडे यांनी पाठविलेले पत्र…

पु. ल. देशपांडे,
१, रुपाली, ७७७, शिवाजी नगर, पुणे – ४.

८ जून १९८० प्रिय अशोक आजचा दिवस तुझ्या आणी कोमलच्या आयुष्यात सर्वात
महत्वाचा. सुमारे चौतीस वर्षांपूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणी तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता. या चौतीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर ‘लग्न’ या विषयावर तुला चार उपदेशपर गोष्टी सांगाव्या, असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर चार शब्द सांगू नये, असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी चार युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्या, असं मला वाटलं. या संबंधात ऑस्कर वाइल्डचे एक वाक्य ध्यानात ठेव. “A Perfect marriage is based on perfect mutual misunderstanding”.लग्न हे नवराबायकोच्या एकमेकाविषयी असणा-या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असते. आता माझेच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे, असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आजतागायत गैरसमज आहे. लग्नाच्या रजिस्टरबुकात सही करायला मी खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या ह्यॅटवर. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याचा त्या ह्यॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कुणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो, तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या
माझ्या लेंग्याच्या आणि काचा घूसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका याच ठिकाणी घाम फुटतो. पण ते जाऊ दे. सांगायची गोष्ट मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकवून ठेवला आहे. यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याचा दु:खापेक्षा ‘मी अव्यवस्थित आहे’, या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचा भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे ‘तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस’, असा जर तिचा गैरसमज झाला, तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू भक्कम आहेस असं वाटत असलं, तरी स्री-दृष्टी हा एक खास प्रकार आहे. या नजरेने पुरुषमाणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रदिंवस हापिसच्या कामाचीच चितां करतोस असा जर कोमलचा समज झाला, तर अधूनमधून खोकला वगैरे काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी वगैरे खाऊन टाक. डॉक्टरीण बायकोने केलेल्या गोळीच्या सांबाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते, असे एका डॉक्टरणीशी लग्न केलेल्या फिजिओथेरापिस्टचे मत आहे. (पुढील सहा महिने मी जसलोकपुढून जाणार नाही!) आता खोकला काढताना या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही, याची खात्री करून घे. (‘तरुणी’ हे वय हल्ली ५७-५८ वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. कारमायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल.)
गाफीलपणाने खोकला काढलास तर ‘हा खोकला कुणासाठी काढला होता ते खरं सांगा-?’ या प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी.

सुखी संसारात नवऱ्याला स्वत:चे मत नसणे, यासारखे सुख नाही. विशेषत: प्रापचिंक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न यावर मतभेद चालतील. पण भरलेले पापलेट आणि तळलेले पापलेट यातले अधिक चांगले कुठले? या विषयावर सौ.पक्षाचे मत ऐकून तेच ‚ग्र्याह्य मानावे. बेसावधपणाने कारवारी पद्धतीच्या स्वैपाकावर बोलून जाशील. मुख्य म्हणजे ‘राव’ या आडनावाचा/ची प्रत्येक व्यक्ती ही असामान्य मानावी. कुठल्या क्षणाची कुठला/ कुठली राव ही वधूपक्षाभ्या नात्यातली निघेल, हे सांगणे अशक्य आहे. मी रवीनद्रनाथाविंषयी नेहमी चांगलेच बोलतो याचे खरे कारण यांचे आडनाव ‘ठाकूर’ आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे ‘बोरकर’ या आडनावाविषयीही सावध असावे. जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. संसार म्हणजे खायची गोष्ट नाही. (बायकोच्या हातचे जेवण सोडून. ते खावेच लागते.) उदाहरणरार्थ, ‘मीसुद्धा मनात आणले असते, तर डॉक्टर झालो असतो,’ हे वाक्य चुकूनही उच्चारू नये. उलट, ‘बापरे! डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं. याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते,’ हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधूपक्षाला ऐकवीत जावे. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूण Medical Professionविषयी जपूनच बोलावं लागेल. वधूपक्षातले तीन विरुद्ध तू एक या सामन्यात तुझ्या कराटेच उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या, तरी मते फोडता येत नाहीत. यामुळे MedicalProfessionसंबंधी उगीचच मतभेद व्यक्त करणे टाळावे. तुझ्या Technologyबद्दल घरात एक अक्षर न काढणे बरे. फारच कोणी वखुपक्षीयांनी सख्या काय चाललंय वगैरे विचारलं, तर सात-आठ टेक्नीकल शब्द घालून एक वाक्य फेक. (यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही, याची खात्री करून घे!) म्हणजे तू तुझ्या विषयातल्या जगातल्या पाच शास्रज्ञांपैकी एक आहेस, हा समज (गैरसमज म्हणत नाही!) पक्का होईल. आणिDiamond Shamrockमधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे Shamकिंवा निर्बुद्धrockहा समज वाढीला लागून घरात इज्जत वाढेल.

कोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्री-मतदारांची संख्या एका आकड्याने वाढत आहे, हे विसरू नये. भरतचा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लांबत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव (अख्यक्ष शेणवी सहकारी पेढी) विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असे गव्हर्मेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी ‘पंजा’चे राज्य आहे हे विसरू नये. आणि घरात सतत होणा-या ‘शॉपिंगला’ उगीचच विरोध न करता बाजारातून जे जे काही म्हणून घरात विकत आणले जाईल,याचे ”अरे वा!”, ”छान!”, ‘ O Wonderful!” अशा शब्दांनी स्वागत करावे. बाहेर जाताना ‘ही साडी नेसू का?’ हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावे म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला, तरी कौटुबिंक व्याकरणात ते एक ‘मी ही साडी नेसणार आहे’ असं Firm Statementअसते. या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्याचा (साडीकडे) अभिनय करून- वा! हूंss! – हो हो -, छान – फार तर Fantastic Idea, असे प्रसंग पाहून आवाज काढावे. अगर ‘ही नेसतेस?’ – अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून ‘कुठलीही नेस. कोण बघतंय’ यासारखी वाक्यं ओठाशी आली, तरी गिळून टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींकडून सूचना आली की लगेच agreedम्हणून सही. राष्ट्रपतींचे हे धोरण सर्वसामान्य पतींनीही स्वीकारावे. उलट पार्टीला वगैरे जाताना ‘यातला कुठला बुशशर्ट घालू? तुझा Choiceनेहमीच फसक्लास असतो – वगैरे वाक्यं टाकावी. माझ्या Choiceपेक्षा तुझा Choiceचांगला असतो, या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही, याची खात्री बाळगावी. नाहीतर ‘कळतात ही बोलणी …’ हे वेदाइतकं जुनं वाक्य ऐकावं लागेल. मग यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला ‘मला नाही माहीत’ हे उत्तर. शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट. सौ.च्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅण्ट घालायला विसरलास तरी चालेल. पण बायकोची जन्मतारीख विसरणाच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. presentsसुद्धा देतात. पण इतर कुठल्याही Presentपेक्षा या दिवशी नवऱ्याने ऑफिसला absentराहण्यासारखे दुसरे Presentनाही. कांदेनवमीला जसे आपल्याला कांदा आवडला नाही, तरी धार्मिक भावनेने कांदा खातात, तसे बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी, ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटले तरी टाळावे असे वाटते – तसल्या, बायकोच्या तमाम नातेवाईकांना, काहींना दुपारी आणि काहींना रात्री जेवायला बोलावण्याचा बायकोला आग्रह करावा, असे एका तज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे आपण सुटी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलावल्यामुळे ती दिवसभर स्वैपाकघरात. घरात तिचेच नातलग आणि यांची प्रजा. घरातली काचेची भांडी या बालकांच्या सहज हाती लागतील, अशा जागी ठेवावी. भावाच्या किंवा बहिणिच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौ.चा ‘आवाज’ बंद. आपणही हा मोका साधून – अहो – मुलंच ती – करणारच मस्ती. वगैरे बोलावं. आणि मेहुणे-मेव्हण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा वस्तू यांना दिसतील अशा ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेपरेकॉर्डर, डिक्स वगैरे असतात, या खोलीतल्या विजेच्या बटणांना शॉक येतो असे सांगून ती खोली बंद ठेवावी. मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा, याला महत्वाचा नाही. त्रिलोकरशेट या माझ्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला, ती हकीकत यांनी मला सागिंतली, तशी तुला सांगतो. ऐक. ”सालं काय सांगू तुला, अरे वाईफचा बर्थ डे. टोटली फरगॉट, जी भडकली. सालं विचारू नको. एकदम नो टॉक. बरं, साली बायको अशी टॉकीच्याबद्दल सायलेंट फिल्म होऊन बसली की, आपण तोंड बंद ठेवतो. – जी भडकली – जी भडकली – मी ब्रेकफासला काय आहे विचारल्यावर टीपॉयवरची दाताची कवळीच तिनी काढून खिडकीतून भायेर फेकून दिली. साली टू-थर्टिफाइव रुपीज टिकवून तळपदे डेंटिसकडून आणलेली कवळी भाई जीवनजी लेनवर, साले बत्तीसच्या बत्तीस दात पसरले. आणि साला जोक सांगतो तुला. कवळी फेकली ती माझी समजून तिची स्वत:चीच. माझे दात पाण्यानी भरलेल्या बाऊलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी सालं पटकन माझी कवळी तोंडात घातली – तिचं विदाऊट टूथ तोंड पाह्यल्यावर एकदम साली आमच्या डोळ्यातली ट्यूब पेटली – साला वाईफचा फिफ्टिएट्थ बर्थ डे. कारण बरोबर फिफ्टीसेकंड बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. बर्थडेच्या दिवशी कवळी फेकून बसली – मला सालं समजेना, हॅपी बर्थ डे म्हणू का नको म्हणू? तसाच साला चफ्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला दयाराम मिठायवाला पण अवंग साला. याला धादा वॉर्न करून सागिंतलं – नरम बुंदी. तर या इडियटनी पिशवीत भरून दिले एक डझन कडक बुंदी. साला वाईफच्या तोंडात नाय दात – ती कडक बुंदी काय खाणार कफ्पाळ. साला तिला वाटलं, मी पर्पजली कडक बुंदी आणली. साला तुला सांगतो. तोंडात दात नसताना या वाइफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंडपण हॉरिबल आणि साईट तर मल्टिफ्लाईड बाय हंड्रेड हॉरिबल. आता मी काय ट्रिक केलीय म्हाईत आहे? साईबाबाच्या फोटोखाली भिंतीवर खिळ्यांनी वाईफची बर्थ डेट कोरून ठेवली आहे. साल्या दाताच्या कवळ्या म्हाग किती झाल्यायेत म्हाइत नाय तुला? – करणार काय? मीच इडियट साला. वाईफचा बर्थ डे विसरलो. ”

असो. नवीन लग्न झालेल्या वराचा फार वेळ घेऊ नये. असा वेळ घेणारा माणूस पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दूधवाला भय्या होतो म्हणतात. पण माझा हा उपदेश पाळणा-यास उत्तम संसारसुख प्राप्त होऊन, ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमख्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणे वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होवोन संसारात सदैव आनंदी, आनंद नांदेल. तथास्तु.

तुझा
पी. एल. काका

आज बरोबर १ वषॅ झाले मला अमेरिकेला येऊन..!!
आजही मला तो क्षण आठवतो.. शोनाई( कोण?.. अहो माझी बायको!!.. खरंतर तिच नाव अनुराधा आहे पण प्रेमांनी मी तिला शोनाई म्हणतो.. असो!! )मला सांगायचा प्रयत्न करत होती की.. “नको जाऊस रे.. मला एकटीला सोडून.. “. तिचे पण बरोबर होते म्हणा.. तुम्हीच सांगा नवीन लग्न झालेल्या मुलीला जर असे एकटे राहावे लागले तर…

राहून राहून मला Sandeep khare ची एक कविता आठवतं होती..

गाडी सुटली.. रुमाल हलले.. क्षणात डोळे टचकन ओले..
गाडी सुटली.. हातामधला हात कापरा तरी सुटेना..
हे भलते अवघड असते….

ऐकायला ही कविता जेवढी चांगली वाटतं होती, अनुभवायला तेवढीच कठीण जात होती.

मी संगणक अभियंता, त्यामुळे हि परदेसी वारी अपेक्षीतच होती, पण ती उपभोगायला असल्या काही परीक्षेतून जावे लागेल याची काही कल्पना नव्हती.
ते म्हणतात ना की “तुम्ही नव्हे, तर परिस्थितीच तुम्हाला कठोर निॅणय घेण्यास भाग पाडते.. ” तसलेच काही आमच्या बाबतीत झाले. बायको ची नवीनच नोकरी लागली होती, त्यामुळे तिला सुट्टी मिळणे अवघड होते म्हणून मग मीच एकटे अमेरिकेला जावे असा निॅणय झाला. saving हा सुद्धा त्या निॅणया मागचा मोठा हेतू होता.
मग काय.. “चठ जावो बेटा सुली पे.. ”
मी जाण्याच्या दिवशी, आम्ही सगळे (मी, बायको, आई, बाबा.. अशी वरात घेऊन (पुन्हा एकदा!! ) पुण्याहून खारघरला म्हणजे माझ्या सासुरवाडीला सकाळी पोहचलो. माझी flight रात्री ११:४५ ला होती तेव्हा जेवण आणि आराम करून आम्ही संध्याकाळी ५:३० ला airport कडे निघालो. गाडीत, मी आणि बायको मागे बसलो, आई, बाबा.. वैगरे पुढे बसले होते. मी शोनाईचा हात घट्ट धरला होता. खारघर ते airport बरेच लांब असल्याने आम्हाला १-१:३० तास तरी मिळाला. दोघेपण बोलत नव्हतो पण आमच्या नजरा सार काही गुपित उघडत होत्या.

आम्ही airport ला पोहचलो, फार जड अंतकरणाने मी सगळ्यांचा निरोप घेतला.

प्रथम माझा project हा ६ महिन्यानचा होता, पण हो-नाही करत आज १ वषॅ झाले.

झाले.. आता शेवटी हा project जून ला संपतो आहे… 🙂 आणि मी मुक्त होणार…
आज राहून राहून एकच गाणे ओठावर येते आहे…

ने मजसी ने परत मातृभूमी ला… सागरा प्राण तळमळला… सागरा…