Posts Tagged ‘वीनोदी’

काल माझ्या मित्राचा फ़ोन आला होता. तो घर घेतोय आणि एस.बी.आय. बँकेकडुन लोन घेण्याबद्दल तो विचारत होता. मी त्याल म्हटले लोन तर मिळेलच पण त्या आधी २-३ गोष्टींची तयारी ठेव.

१. कमीत-कमी शब्दात स्वतांचा पाणउतारा करुन घेणे
२. लोनची तुला गरज आहे बँकेला नाही
३. तुझ्यापुढे राहुल राँय सुद्दा बीझी वाटेल इतका तु रिकामा आहेस.
४. तुज़्या जीवनात लोन पास करुन घेणे हे एकच धेय राहिल (निदान पुढचे २-३ महिने)

मी हे सगळे सांगीतल्यावर तो जरा घाबरलाच. मी म्हटले घाबरु नको रे, पण मनाची तयारी करुन ठेव. साहेबांनी डोक्यावर जास्त ताण न ठेवता सरळ प्रश्न केला
“मला एखाद्या एजन्टचा नंबर दे”
“एजन्ट? अरे या कामसठी तुला एजन्ट कशाला हवाय?” मी जरा चिडुनच बोललो.
“म्हणजे हे काम तु स्वतां केले?” मीत्राने अगदी मी दुपारी १ ते ४ च्या वेळेत चीतळे बंधु कडुन बाकरवडी विकत घेण्याइतके अशक्य काम केल्याचे आश्चर्य करुन विचारले.

मला हल्ली खरच कळत नाही आज-काल लोकांना प्रत्तेक गोष्टीसाठी एजन्ट का लागतो?
मान्य आहे बरेच वेळेस वेळ नसतो, गोष्टी लवकर हव्या असतात, पण नेहमीच असे असते असे नाही. बरेच वेळेस तर मला वाटते की लोकांना सरकारी कामांबद्दलची प्रक्रिया माहीती नसते, शिवाय ती जाणुन घ्यायची नसते 😦 त्यामुळे उठ-सुट एजन्ट शोधा आणि यामेळेच त्यांचे फ़ावते.
एजन्ट लोक वाट्टेल ती फ़ी मागतात. जे काम सहज होऊ शकते त्यासाठी लोक उगीचेच या एजन्ट चा खिसा गरम करतात.
पुण्यात तर या एजन्ट लोकांनी उच्छाद मांडलाय नुसता. भाड्याने घर घेण्यासाठी तर हे लोक कळस करतात. मागे मी एकदा घर भाड्याने घेण्यासाठी शोधत होतो. बरेच लोकांनी सल्ला दीला के “अरे, एजन्टच्या मदतीने लवकर घर मिळेल..थोडे पैशे जातात पण तुला घाई आहे तर लगेच मिळेल घर”
म्हटल आपल घोड अडलय तर चला धरावे पाय एजन्टचे (इथे मला जे म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले असेलच). मी एकाला फ़ोन केला तर साहेबांनी ३-४ घर असल्याचे सांगितले. ते मलाच बघवे लागणार होते, शिवाय तो मालकाशी भाडे/डीपाँझीट कमी करण्याबाबत काहिच मदत करणार नाही. मी विचारले “तुमच्या फ़ी चे काय? ”
तर साहेबांनी लिस्ट्च सुरु केली.
“दोन महीन्याचे भाडे, स्टाँम्प पेपरची पैसे वेगळे. पेपर तुम्हाला आणावा लागेल.” मी मनात म्हटले हो..तुझा हुन्ड्यात द्यायचे राहिले होते ना.
“जर एक वर्षानंतर नविन करार करायचा असेल तर मला एक महिन्याचे भाडे द्यावे लागेल.” मी विचारले “तुम्ही मला घर दखवण्यापलीकडे काहीही मदत करत नाही आहत..तर मग हे नविन करारचे पैसे का?”
“साहेब, असेच असते ते..तुम्हाला पहिजे की नाही ते बोला?”
मी कपाळाला हात लावला आणि फ़ोन ठेवला. ईतके करण्यापेक्षा मी माझ्या रहात्या घरात ५०० रुपये भाडे वाठउन राहीलो तर मला स्वस्त पडेल. 🙂

हे असे सुरु असते, तरी सगळे याला डोळे झाकुन बळी पडतात. थोडा त्रास घ्यावा लागतो पण ही छोटी-मोठी कामे सहज शक्य आहेत.
हे जर असेच सुरु राहिले तर, बापाच्या शेवटच्या विधीसाठी सुद्धा एजन्ट शोधणारी माणसे दिसतील.

Advertisements

बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आई संक्रांतीच्या हळदी-कुंकासाठी बाहेर गेली होती. तिला बराच वेळ लागणार होता कारण गल्लीतल्या ५-६ ठिकाणी कारेक्रम होता. घरी मी आणि बाबा. सहसा आईचा हळदी-कुंकाचा प्रोग्रॅम असला की मी घरीच असायचो.. ती घरी आली की पहिले मी त्या ओटी वर हल्ला करायचो.. ओटीतले बोरं, शेंगा, हरबरे, गाजर, ऊस शोधून खाण्यात वेगळीच मजा आहे. आमच्याकडे हळदी-कुंकू असले की आई मला बाहेर पिटाळायची… कारण ओटीतले निम्मे ऊस मीच फस्त करत असे. मला ऊस खूप आवडतो. तोही दातांनी सोलून. कोणी ऊसाचे छोटे-छोटे तुकडे केले की मला बिलकुल आवडतच नाही… बाबा आजही रवीवारी ऊस दिसला की न विसरता आणतातच… असो

घरी मी आणि बाबांच होतो.. दोघांनापण भूक लागली होती. मग बाबांनी सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आणि मोर्चा स्वयंपाक घराकडे वळवला. आमचे बाबा तसे उत्तम कुक. त्यांच्या हातची स्पेशल कचोरी म्हणजे माझी ऑल-टाइम फेवरेट. पण घाई-गडबडीत नेहमी काहीतरी गडबड होते आणि डीश बिघडते.. :-).

कीत्तेक वेळेस तर बाबांनी मसाल्याचा चहा करताना चहात चहा मसाला न टाकता ‘गरम मसाला’ टाकला आहे. मग सगळे खापर आईवर फोडल्या जाते..

” ही न नेहमी ते डबे इकडचे तिकडे करत असते.. त्यामुळे माझा गोंधळ होतो.. ” बाबा त्यांचे हे पेटेंट वाक्य बोलून फसलेल्या प्रयोगावर झाक घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.

आता तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. मी ‘मसालेदार’ चहाचा पहिला घोट घेतल्यावर लगेच ओळखतो की आईने पुन्हा गरम मसाल्याची बाटली बदली म्हणून.. :-).

बरं चश्मा घालत जा म्हटले तर “हो!! मला काय धाड भरली आहे न दिसायला??.. ” असे उत्तर मिळते.

अशीच नेहमी सारखी गडबड करत बाबांनी रव्याच्या ऐवजी चक्क ज्वारीचे पीठ वापरले. त्या वेळेस आमच्या कडे लाइट नव्हते त्यामुळे कंदीलच्या प्रकाशात पटकन लक्षातपण आले नाही.

शिरा झाला की नाही पाहायला जेव्हा बाबांनी पाहीले तर ” हा असा चिकट-चिकट का वाटतोय??.. ” म्हणून खाऊन पाहिलं व तेव्हा लक्षात आले की बाबांनी नवीन पाककृतीचा शोध लावला आहे.. 🙂

बरं शिरा चांगला साजुक तुपात, काजू-कीशमीश घालून बनवला होता त्यामुळे फेकायची इच्छा होत नव्हती. मग काय.. त्या दिवशी डोळे बंद करून, पाण्यासोबत ढकलत खावा लागला.. 🙂

तेव्हापासून आईला कुठे बाहेर जायचे असले की काहीतरी बनवूनच जाते.. काय सांगता पुन्हा कुठला नवीन पदार्थ खावा लागेल.. 🙂

काल मी आय-पॉड चार्जींग केबल शोधत होतो… काही केल्या मिळत नव्हते.. सगळे घर ‘उथल-पुथल’ केले (‘अंदाज अपना अपना’ चा हा संवाद मला फार आवडतो.. असो) तर फार शोधल्यावर सापडत नव्हते. जवळ-जवळ १ तास शोधल्यावर शेवटी मी हार मानली व त्याचा पिच्छा सोडला.

आता इथे आई जर असती तर “तू डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असशील.. ” हा तिचा टिपीकल डायलॉग मारला असता.

आईचा हा एक भारी समज आहे. कुठलीही वस्तू तुम्हीजर डाव्या हाताने ठेवली तर ती सापडत नाही. आम्ही तिची फार मजा घेतो या गोष्टीवरून. पण कुठल्याही गावातली प्रत्तेक आजी जशी ‘पंजा’वर ठाम असते तशी ती तीच्या मतावर अगदी ठाम आहे. डाव्या हाताने ठेवलेली वस्तू सापडत नाही म्हणजे नाही.

घरात काही ही सापडले नाही की आम्ही तिघे (मी आणि बहिणी) मोठ्याने म्हणायचो.. “अरे!!. डाव्या हाताने कुठेतरी ठेवले असशील.. ” आणि मग घरात एकदम हशा पिकायचा.

वरून ती म्हणायची “हो!! तुम्हाला तर सगळे खोटच वाटते.. अरे खरंच सांगते आहे मी” मग आम्ही सुरेन शर्माने ‘चार लाईना’ सुनावल्या सारखे पुन्हा हसायचो… 🙂

मी तिला नेहमी म्हणायचो “अग! एक तर मी आहे डाखोरा.. तुझे जर खरे मानले तर मी घरात कुठल्याही गोष्टीला हात नको लावायला? “.

बरं आहे ही गोष्ट अगदीच खरी नाही आहे.. नाहीतर अमिताभ, सचिन तेंडुलकर, सौरभ.. वैगरेंची जाम पंचाईत झाली असती. सचिनला बॅटिंगला जायचे आहे आणि काय तर म्हणे साहेब आपली बॅट शोधता आहेत.. हा!! हा!! हा!!

माणसाचा एकदा का कोणत्या गोष्टी बद्दल समज बसला की काही केल्या जात नाही… ते सुपरस्टेशियस जे म्हणतो ना तेच. लोकांचे असेच विचित्र समज असतात. आमचे बाबा मला कधीच शनीवारी कटिंगला(म्हणजे केस कापायला.. बाग काम नव्हे.. पण आमच्या भैय्या साठी दोन्ही ही कामे सारखीच..:-) ) जाऊ देत नाही.. का विचारलं तर.. “नाही.. म्हटले म्हणजे नाही.. ” एव्हडेच उत्तर मिळते… 😦 शनिवार आणि रविवार दोनच दिवस मिळतात.. त्यातही शनिवारी नाही म्हटले म्हणजे रविवाराचा अर्धा दिवस त्या भैय्याच्या दुकानात जातो.. तो ही या गोष्टीचा फायदा घेत सगळे भोजपुरी गाणे लावतो… रविवाराची सकाळची झोप जाते ती वेगळीच.

हुम!! जाऊद्या काय करणार… 😦

मी जेव्हा अमरावतीत इंजिनियरिंग कॉले़जमध्ये होतो तेव्हाची ही आठवणं.

मी १२ जरा बऱ्यापैकी मार्काने पास झालो. याचे सगळे श्रेय आईला.. तिने जर रागावून, गदा-गदा हालवून, प्रसंगी पांघरूण ओढून मला रोज सकाळी उठवून अभ्यासाला बसवले नसते तर आज हे दिवस दीसले नसते.. असो. माझ्यापेक्षा तिलाच जास्त काळजी होती. तुम्हाला खोटे वाटेल पण त्या वर्षी आमच्या घरातला टी. व्ही. कपाटात बंद होता.. असो. तर जरा बरे मार्क मिळाले त्यामुळे अमरावतीला जाऊन इंजिनियरिंगच फॉर्म भरून आलो. सरकारी कोट्यामध्ये बडनेरा इंजिनियरिंग कॉले़जमध्ये प्रवेश मिळाला.

अमरावती असल्यामुळे घरच्यांना काळजी नव्हती. अमरावतीमध्ये माझे बरेच नातेवाईक आहेत. आत्या, दूरचा मामा, मावशी आणि शिवाय माझी मोठी बहीण सुद्धा अमरावतीतच दिली आहे. कॉलेज सुरू व्हायच्या आधी मी आणि बाबा रूम शोधायला अमरावतीत होतो. (तुम्ही म्हणाल इतके नातेवाईक असताना रूम कशाला.. पण माझे आणि बाबांचे मत होते की ४ वर्ष नातेवाईकाकडे??… नको त्यापेक्षा रूम बरी) . कॉलेज सुरू झाल्यावर २-३ महिन्यात मी सावरकर काकू कडे पेइंग-गेस्ट म्हणून राहायला गेलो.

आमच्या सावरकर काकू म्हणजे अगदी प्रेमळ, मनमिळाऊ. घरचे तसे श्रीमंत पण दोन्ही पोर पुण्याला शिकायला होते, घरी या एकट्या असायच्या. कोणाचीतरी सोबत असावी म्हणून मग वरच्या मजल्या वरील एक रूम आम्हाला भाड्याने दिली होती. काकूंनी आम्हाला मुलासारखंच सांभाळलं. खायला-प्यायला कधीच कमी केले नाही. त्यांच्या हातच्या पुरण-पोळ्या आहाहाहा!!!.. अरे विषयांतर होतंय..

तर अशा आमच्या काकू, त्यांच्या बंगल्यावर लोकांची बरीच वर्दळ असायची. काका आर्किटेक्ट होते. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता त्यामुळे घराकडे बरीच लोक असायची. तेव्हा त्यांच्याकडे बरीच माणसे कामाला असायची त्यातले एक म्हणजे “हमिद भैय्या”. त्यांचे रोजचे काम म्हणजे शीबुला, काकूंकडे पाळलेली कुत्री, रोज सकाळी तिला खाऊ घालणे आणि समोरच्या गेटपाशी बांधून येणे. आता लोकांचे, मुख्यता मराठी, एक कळत नाही, मुसलमान माणसाशी हे हिंदीत का बोलतात?.. खरं तर ते महाराष्ट्रात राहतात, त्यांचा जन्म इथला, तर मग उगीचच हिंदीचा अट्टहास का?… त्यांची खरंतर उर्दू भाषा असते. मराठी आणि तामिळ भाषेत जितका फरक आहे तितकाच उर्दू आणि हिंदीतही आहे की. बरं एक वेळ हे मान्यही केलं असत पण आपल्या मराठी माणसाची हिंदी म्हणजे.. वा!! काय बोलता.. 🙂

आमच्या काकूंची हिंदी पण एकदम सॉलिड. सकाळी त्याच्या हिंदीतल्या ऑर्डरी सुरू व्हायच्या.

‘हमिद भैय्या!!. वो शीबू की साखळी इकडे बांधो’..

‘हमिद भैय्या!!. वो शीबू को दूध-पोळी टाक्या के नही? ‘..

‘हमिद भैय्या!!. शीबू ने उपर बाल्कनी मे कुच घाण किया क्या बघो तो जरा.. ‘

‘हमिद भैय्या!!. जल्दीसे गाडी धुवो सहाब को जाना है. ‘

वैगरे.. वैगरे…

अशा अनेक हिंदी(?? )त्ल्या ऑर्डरी सुरू होत असत.. आम्ही मात्र पोट धरून हसत बसायचो.. 🙂

आज् का जाणे कोणास् ठाउक्,पण् ऑफिसला जाण्याचा जाम कंटाळा आला होता.आधीच अर्धा तास उशिर् झाला होता.बाबा फिरुन् येउन “सकाळ” ला चहा सोबात् चघळत् होते.मी हॉलमध्ये आलो तसे बाबा म्हणाले ‘अरे!! अजुन् आंघोळ नाही झाली? ऑफिसला नाही जायचे का?’

‘नाही आज् फार् कंटाळा आला आहे’ मी जांभाळी देत् उत्तर् दीले.

‘अरे मग् ऑफिसला निरोप पाठउन् दे..नाही येत् म्हणुन्..’- बाबा

‘हो..हे काय् तुमचे तहसिल ऑफिस आहे का..की राउत काकाला सांगितले की झाले.’ मी हे वाक्य पुर्ण करेस्तोवर् बाबा हसायला लागले.

बाबांची नोकरी बुलढाणा या छोट्याश्या गावात् तहसिल ऑफिसला होती.माझे पुर्ण बालपण तेथेच् गेले.बाबांच्या वेळेला पॉलीसी आवडली नाही किंवा ऑफिसचा स्टाफ् आवडला नाही म्हणुन् नोकरी बदलण्याची पध्धत् नसावी म्हणुनच् ते एकदा जे तहसिल ऑफिसात चिटकले ते चिटकलेच.

तहसिल ऑफिस मधिल बहुतेकांना “ऑफिस ला येण्याची वेळ” असला फालतु प्रकार तर् माहितीच नव्हता.आमच्या बाबांची वेळ् मात्र् ठरलेली १०-१०:१० पर्यत् ते ऑफिसला असायचे.बाबाच् सर्वात् आधी ऑफिसला पोचायचे.ऑफिस म्हणजे एक् चॉक् ओलांडला की आले.एखाद्या वेळेस जर् घरी पाव्हणे आलेच् तर् २ मिनीटात् बाबा घरी असायचे.आता मला जर् असे घरी यावे लागले तर् १५-१६ की.मी. ड्राईव्ह करुन यावे आगेल् शिवाय् अर्धा दीवस् सुट्टी टाकावी लागेल्.सकाळी ६:१५ वाजता नळ् यायचे म्हणुन् ६ वाजता उठायचे,पाणी भरुन् भराभर् आंघोळी उरकाव्या लागायच्या.बाबांची पुजा मग् ८-९ वाजेपर्यत् चालत् असे.पुजा झाली की तयार् होउन् उभ्या-उभ्याच दोन पोळ्या जेवायचे.

ऑफिसची बाकिची मंडळी आरामात् ११-११:३० वाजता यायची.आल्यावर् मग् ‘बडेबाबु!! चला चहा घ्यायला'(ऑफिसमध्ये बाबांना सगळे बडेबाबु म्हणायचे)मग काय एक् दीड तासाची निचंती असायची.दुपारी १:३०-२:०० वाजता बाबा चहासाठी घरी येत् असत.चहा म्हणजे एक् निमीत्य असायच्.जेव्हा टी.व्ही. वर् दुपारी वेगवेगळ्या मालिका असायच्या.त्यात् “शांती” ही आमच्या बाबांची आवडती मालिका.नंतर् मग् उन्हाळ्याच्या सुट्टीत ताई माहेरी यायची,मग् काय् नातवासोबत खेळायला दुपारी आजोबा हजर् असायचे.हो आणी दुपारी ऑफिसला जायच्या आधी एक् १०-१५ मिनिटे झोप सुध्धा व्हायची.३ वाजता ऑफिसला गेल्यावर मग् संद्याकाळी साधारण् ५-५:१५ ला बाबा घरी येत् असत.

एखाद्या दीवशी जर् ऑफिसला जाण्याचा कंटाळा आलाच,किंवा घरी काही महत्वाचे काम् असले की मग् ‘प्रसाद्!! जा राउत काकांना सांगुन् ये की मी काही आज् ऑफिसला येत् नाही.बी.पी. चा त्रास होतो आहे म्हणाव’ सहसा हेच कारण् असायचे.बी.पी. हा त्यांचा कसलासा कोडवर्ड् असावा असा मला दाट् संशय होता.

मग् मी त्यांचा दुत बनुन ऑफिसला राउत काकांना शोधत् बसायचो.मी ईतके वेळा ऑफिसला गेलो असेल् पण् हे राउत् काका त्यांच्या जागेवर् मला कधिच भेटले नाही.मग मला अख्खे तहसिल् ऑफिस शोधावे लागायचे.नंतर्-नंतर् या राउत् काकांचे सगळे अड्डे मला माहित् झाले होते.ठरावीक वेळेस ते कुठल्या अड्ड्यावर् असतिल् हे हेरुन मी थेट् तिथेच त्यांना गाठत् असे.त्यांना निरोप् सांगितल्यावर् ‘बर्!!बी.पी. चा त्रास का. ठीक आहे.’ असे म्हणत् एक् रहस्यात्मक हास्य द्यायचे.मला तर असे वाटते आपल्यापण ऑफिसला असे राउत् काका असते तर्.

बाबा “संजय गांघी निराधार् योजना” बघत् असल्याने दर् ३-४ महिन्यात् आमच्या डोक्यावर् money order री लीहिण्याचे काम् येउन् पडत् असे.’तुमचे अक्षर् छान आहे’,’तुम्हाला उन्हाळ्यात् काय काम् आहे?’,’उन्हात् खेळण्यापेक्षा हे काम् बरे’..अशा या ना त्या कारणांवरुन् बाबा त्या money order री घरी घेउन येत् असत् व आम्हाला कामाला जुंपत् असत्.मला मात्र् फार् मजा येत् असे हे काम करण्यात्.

तर् असे ते तहसिल् ऑफिस बाबांचे जेव्हडे होते,तेव्हडेच आमचे देखिल होते.हा सगळा विचार् करत् मी ऑफिसला कधी पोहोचलो कळालेच नाही.माझा बॉस माझ्या क्युबिकल समोरच उभा होता.मला बघुन् त्याने घड्याळाकडे बघितले.

‘प्रसाद्!! व्हाय आर् यु लेट् टुडे?’

‘सकाळी थोडा बी.पी. चा त्रास होत् होता..’असे म्हणुन् मी मनातल्या-मनात् हसु लागलो.

सौ.चा वाढदिवस..

आज् २९ मे..म्हणजे आमच्या सौ.चा वाढदिवस.

तुम्ही म्हणत् असाल्..’वा!! काय् छान नवरा आहे’ बायकोचा वाढदिवस ह्याच्या बरोब्बर् लक्क्षात् आहे.कस काय जमते तुम्हाला?

खर् सांगायच् झाल तर् तुम्हाला फार् मेहनत घ्यावी लागते,फार् घोकमपट्टी केल्यावर् हे लक्क्षात् रहातेय.

मोबाईलमधे,Personal laptop मधे, Office computer मधे reminders टाकुन ठेवले आहेत् (ज्या लोकांनी ह्या reminders चा शोध लावला आहे तयांना समस्थ नवरा जमाती तर्फे कोटी-कोटी धन्यवाद्..असो). झालच् तर् घरात् असतील्-नसतील् तेव्हड्या सगळ्या Calendar वर् २९ मे कोरुन् ठेवली आहे.माझ्या मेंदुने जर् मला ऐनवेळी दगा दिलाच तर् हे सगळे मला आठवण् करुन् देतिल्.

कधी-कधी तर मला अचानक् रात्री जाग् येते..असे वाटते की मी बायकोचा वाढदिवस वीसरलो की काय्..असो.तर् सांगायचा मुद्दा असा की तुम्ही दुसरे काहीही विसरा पण बायकोचा वाढदिवस विसरु नका.जगातले सर्व् गुन्हे माफ् पण हा गुन्हा नाही.

तुम्ही विचार् करत असाल् की..’हात् तिच्या ऐवठच् ना!!’,पण नुसता वाढदिवस लक्क्षात् ठेउन् चालत् नाही.तर् दोघांनी ‘पहील्यादा’ केलेल्या सगळ्या गोष्टी लक्क्षात् असाव्या लागतात्.

१. पहीली भेट् ‘कुठे’ झाली..जागा बीनचुकता दाखवता आली पाहिजे..उदा: hotel मध्ये कुठला टेबल् होता हे बीनचुक दाखवता आहे पाहिजे. आठवत् नसेल् तर् बायकोशी हुज्जत् घालु नका..अमेरिका जेव्हड्या अचुकपणे ओसामालाही शोधु शकणार् नाही..तेव्हड्या अचुकपणे बायको तो टेबल शोधुन् काधेल्.

२. पहीली भेट् ‘कधी’ म्हणजे वेळ् लक्क्षात् असणे आवश्यक.तुम्ही जर उशीरा(१-२ मीनीटे पेक्षा जास्त) पोहोचले असाल्(ह्याचीच् शक्यता जास्त आहे) तर् दर् वेळेस् त्याचा उल्लेख् करुन् माफी मागावी आणी सौ जर् उशीरा(१-२ तासापेक्षा जास्त) आल्या असतील तर् त्याचा उल्लेख टाळावा

३.पहीली भेट् ‘कशी’ झाली..म्हणजे भेट कोणी घडउन् आणली…वैगरे (शक्यतो बायकोच्या माहेरच्या व्यक्तीला प्राधान्य द्यावे..असो)

४. यापेक्षा महत्वाचे म्हणजे सौ. ने पहील्या भेटीत काय् घातले होते..त्याचा रंग् काय होता. हे सगळे लक्क्षात् असणे आवश्यक.

तुम्ही म्हणाल् या ४ गोष्टीचा वाढदिवसाशी काय् संबंध?..माझे एक् स्पष्ट मत आहे..”माणसाने युध्धासाठी सदैव् तयार् रहावे.” कोणावर् कधी कशी वेळ् येईल् सांगता येत् नाही..असो.

तुम्हाला वाटत् असेल् झाला गढ फत्ते..पण् अजुन् महत्वाचा भाग् म्हणजे..”gift”.

तर् gift च्या बाबतीत् खाली नमुद् केलेल्या गोष्टी टाळाव्यात्.

१. मागील कुठल्यातरी वाढदिवशी दिलेली भेटवस्तु पुन्हा देणे..(तुम्हाला आठवत् नसले तरी “शत्रु” प़क्षाकडे याची पुर्ण् नोंद् आणी पुरावा असतो.)

२. ‘अग!! मागच्या महिन्यात् तर् साडी घेतली होती, म्हणुन् यावेळेस् नाही आणली’..हे वाक्य कुकिंग गँस् लीक् झाल्यावर् काडीपेटी जेव्हड्या लवकर् आग् लाउ शकते..त्यापेक्षा कीत्तेक पटीने लवकर् आग् लाउ शकते.

३. ‘अग!! घाई-गडबडीत् वीसरलो..आत्ता जातो..'(…देव् तुमच्या आत्म्याला शांती देवो..)

आता एव्हडे सगळे करुनही जर् तुम्ही वाढदिवस् विसरलात् तर् घाबरु नका.”शत्रु” प़क्ष तुम्हाला hint द्वारे एक् संधी देणार्.फक्त तुम्हाला ती ओळखता आली पाहीजे.
खाली नमुद् केलेल्या सर्व् वाक्याचा अथॅ “तुम्ही माझा वाढदिवस् विसरले आहात्” असा होतो.
१. ‘आज् आपण् बाहेरच् जेवायला जाउ या.तुम्ही लवकर या.’
२. ‘आज् जरा लवकर् या ना office मधुन्’
३. ‘आज् सकाळ् पासुन् कीती फोन् येताय्..कंटाळा आला बाई फोन् घेउन्-घेउन्’
वैगरे..वैगरे…वैगरे…

असो..माझा उपदेश् पुरे झाला..सगळ्या विसरभोळ्या नवरेमंडळीना ..All the best!!!

पु.ल. देशपांडे नी दीलेला “उपदेश्” नमुद् करतो आहे

चले चलो..

चले चलो..

आता तुम्ही म्हणाल् ‘हा काय् नविन् उपद्व्याप्?’..अमेरीकेतच् गोर्याना ‘हा देश् सोडुन् जा..वैगरे’ असली काही चळवळ तर् सुरु नाही ना केली?

नाही..नाही..तसले कही नाही.आम्ही ना कुठली चळवळ सुरु केली आहे ना आम्हाला कोणी गाडीतुन् बाहेर् फेकले आहे.गांधीजीचा वारसा जरा आम्ही दुसरया प्रकारे ‘चालवतो’ आहे.

गांधीजीची ‘दांडी यात्रा’ आम्ही काही दिवस् झाले रोज् थोडी-थोडी अशी चालवतो आहे.मागच्या २ week पासुन् आम्हाला पायी office ला जावे लागते आहे..:-(

आमचा एक् roommate ज्याच्याकडे गाडी होती त्याला काही कारणास्तव् India ला वापस् जावे लागले.तो गेला त्यामुळे त्याची गाडीपण विकावी लागली.आता जे रुममध्ये रहातात् ते short-term वर् असल्यामुळे कोणीच् गाडी घ्यायला तयार् नाही.मी पण् जुनच्या शेवटी वापस् जाणार्..बर् रोज् cab बोलवावी म्हणाल् तर् घर् ते office जास्तीत् जास्त १-१ १/२ miles असेल्…आणी cab बोलवायची म्हणजे रोजचे $२० जाणार्..(२० * ५० = १०००Rs..आता हे रुपयात् convert करायची गरज् नसते..पण् माझे दोन्ही roommate अमेरीकेत नविनच आले आहेत् त्यामुळे हे होणारच्..असो).

मग् काय् दुसरा कुठलाही पर्याय् नसल्यामुळे पाय्..हे जणु देवाने फुकट् दिलेले वाहन् आहे व् त्याचा जास्तीत् जास्त वापर् व्हावा म्हणुन् रोज् office ला पायी जाणे सुरु आहे.माझी ही यात्रा जुन् संपेपर्यतच् सुरु रहाणार्..पण्..तो पर्यत माझ्यात् ‘मी’ कीती उरतो ते माहीत् नाही.

पु.ल. च्या भाषेत् सांगायचे झाले तर्..office ला पोहोचल्यावर पाय..हा शरिराचा एक् अवयव नसुन् शरिराला जडलेली एक् व्याधी आहे..असेच् वाटते..:-(