Posts Tagged ‘शाहरुख’

शनिवार सकाळी मी चहाचा कप हातात घेऊन गच्चीत उभा होतो. आजच्या सारखा unplanned शनिवार क्वचितच येतो. बरा घरात बकी सर्वांना काम होती. आई-बाबा एका नातेवाईका कडे जाणार होते.. बायकोला बहिणीकडे हडपसर ला जायचे होते. ती गमती ने त्याला “हाड-पसर” असे म्हणते.. असो!! तर आज घरात काहीही काम नसलेला सुखी प्राणी असा मी एकटाच होतो.
चहाचे २-४ घोट पोटात गेल्यावर माझा मेंदू काम करू लागला.. आज काय करावे?.. मस्तपैकी दिवसभर ताणून द्यावी.. की एखादा सिनेमा बघावा.. की मित्रांना जमवून जरा महफील जमवावी.. पण छे.. एकही प्लॅन जमून येत नव्हता. कुठे न कुठे माशी शींकत होती. कुठलाही नवीन सिनेमा लागला नव्हता आणि सगळे मित्र या ना त्या कारणाने बिझी होते.

मी हा सगळा विचार करतच होतो, तेव्हड्यात बायको आतून बोलत आली आणि म्हणाली(ऑर्डर दिली!! )की ह्या डब्यातली “लोणावळा चिकी” संपवा.. (सगळ्यांना मीच बरा सापडतो काहीही संपवायला.. ) मी आपला पु. ल. चा आदर्श पुढे ठेवून जमेल तितक्या सौम्य शब्दात “बरं.. ” म्हणून माझे विचारचक्र पुढे चालू ठेवले.

एकदम डोक्यात प्रकाश पडला.. “चलो लोणावळा!! “.. तसेही बरेच दिवसांपासून जायचेच होते.. नवीन camera घेतला आहे त्याचे पण टेस्टिंग होऊन जाईल. ठरलं तर मग.. “Mission Lonavala”.

पटापट अंघोळ उरकली..t-shirt आणि jean चढवून तयार झालो.. कॅमेरा घेतला.. बाइक काढली.. पेट्रोल कालच भरल्या मुळे मध्ये थांबायची गरज नव्हती. हळूहळू-रमतगमत मी आपला Bangalore-Mumbai highway वर लागलो. लोणावळात आज तशी काही खास गॅदी नव्हती. मी ठरवलं की आज नेहमीच्या स्पॉट वर न जाता.. वेगळ्या ठिकाणी जायचे. असाच भटकत असताना एके ठिकाणी सिनेमाचे शूटिंग सुरू होते. वा!! ये तो सोने पे सुहागा होगया.
camera जवळ होता, मनात म्हटला “देवा!! एखादा आवडता Actor/actress बघायला मिळू दे.. “.. आणि काय सांगू तुम्हाला.. चक्क शाहरुख खान चे शूटिंग सुरू होते. मी बायकोला हजारो धन्यवाद दिले आणि शाहरुखला शोधू लागलो.. पण साहेबांचे अजून मेकअप झाले नव्हते.. थोड्या वेळात शॉट रेडी झाला आणि शाहरुख आला.. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता.. मी माझ्या आवडत्या हिरोला प्रत्यक्ष बघत होतो. (आता तुम्ही म्हणाल की शाहरुख खान मध्ये आवडण्यासारखं काय आहे?.. जाऊ द्या.. पण त्याने जे शून्यातून त्याचे जग उभे केले.. त्याचे कौतुक वाटते एवढंच.. )

जसा मला मोका मिळाला मी त्याला भेटायला निघालो.. तर कोणीतरी मला “प्रसाद!! प्रसाद!!.. ” म्हणून आवाज दिल्याचा भास होत होता.. बायको मला जागे करत होती.. “प्रसाद.. अरे सुट्टी आहे म्हणून किती वेळ झोपणार आहेस?.. ऊठ आता.. तुझ्यासाठी चहा आणि तुझी आवडती लोणावळा चिकी ठेवली आहे.. चल ऊठ लवकर… “..

Advertisements