Posts Tagged ‘project’

आज बरोबर १ वषॅ झाले मला अमेरिकेला येऊन..!!
आजही मला तो क्षण आठवतो.. शोनाई( कोण?.. अहो माझी बायको!!.. खरंतर तिच नाव अनुराधा आहे पण प्रेमांनी मी तिला शोनाई म्हणतो.. असो!! )मला सांगायचा प्रयत्न करत होती की.. “नको जाऊस रे.. मला एकटीला सोडून.. “. तिचे पण बरोबर होते म्हणा.. तुम्हीच सांगा नवीन लग्न झालेल्या मुलीला जर असे एकटे राहावे लागले तर…

राहून राहून मला Sandeep khare ची एक कविता आठवतं होती..

गाडी सुटली.. रुमाल हलले.. क्षणात डोळे टचकन ओले..
गाडी सुटली.. हातामधला हात कापरा तरी सुटेना..
हे भलते अवघड असते….

ऐकायला ही कविता जेवढी चांगली वाटतं होती, अनुभवायला तेवढीच कठीण जात होती.

मी संगणक अभियंता, त्यामुळे हि परदेसी वारी अपेक्षीतच होती, पण ती उपभोगायला असल्या काही परीक्षेतून जावे लागेल याची काही कल्पना नव्हती.
ते म्हणतात ना की “तुम्ही नव्हे, तर परिस्थितीच तुम्हाला कठोर निॅणय घेण्यास भाग पाडते.. ” तसलेच काही आमच्या बाबतीत झाले. बायको ची नवीनच नोकरी लागली होती, त्यामुळे तिला सुट्टी मिळणे अवघड होते म्हणून मग मीच एकटे अमेरिकेला जावे असा निॅणय झाला. saving हा सुद्धा त्या निॅणया मागचा मोठा हेतू होता.
मग काय.. “चठ जावो बेटा सुली पे.. ”
मी जाण्याच्या दिवशी, आम्ही सगळे (मी, बायको, आई, बाबा.. अशी वरात घेऊन (पुन्हा एकदा!! ) पुण्याहून खारघरला म्हणजे माझ्या सासुरवाडीला सकाळी पोहचलो. माझी flight रात्री ११:४५ ला होती तेव्हा जेवण आणि आराम करून आम्ही संध्याकाळी ५:३० ला airport कडे निघालो. गाडीत, मी आणि बायको मागे बसलो, आई, बाबा.. वैगरे पुढे बसले होते. मी शोनाईचा हात घट्ट धरला होता. खारघर ते airport बरेच लांब असल्याने आम्हाला १-१:३० तास तरी मिळाला. दोघेपण बोलत नव्हतो पण आमच्या नजरा सार काही गुपित उघडत होत्या.

आम्ही airport ला पोहचलो, फार जड अंतकरणाने मी सगळ्यांचा निरोप घेतला.

प्रथम माझा project हा ६ महिन्यानचा होता, पण हो-नाही करत आज १ वषॅ झाले.

झाले.. आता शेवटी हा project जून ला संपतो आहे… 🙂 आणि मी मुक्त होणार…
आज राहून राहून एकच गाणे ओठावर येते आहे…

ने मजसी ने परत मातृभूमी ला… सागरा प्राण तळमळला… सागरा…

Advertisements