Archive for ऑक्टोबर 1, 2010

Two thousand prints, around 10,000 shows, international technicians and makeup artists, award winning sound engineering and music – as the extravagant 200-crore saga unfolds this weekend – it will also shatter the myths of ‘small market, small budget’. The notions of ‘Tamil cinema being a small market and hence there are restrictions with regard to budget’ will be flushed down the drain as Endhiran releases to a whopping number of 600 screens in Chennai city alone.

 आता तुम्हीच सांगा असला जबरदस्त सिनेमा सोडणार आहे का?

तिकिटांसाठी १-२ मित्राकडे चौकशी केली, तर काळाले की १ तासात सर्व तिकिटे विकल्या गेली. हीच कहाणी सगळीकडे होती. मी पण मग जिद्दीला पेटलो. काही करून तिकीट मिळवायचेच. ४-५ कॉन्टॅक्ट कडे हात-पाय जोडुन विनंती केली, तेव्हा कुठे ब्लॅकमधे ५०० रुपयात तिकीट मिळवले. (बायकोला जर हे कळले तर त्या रुपयात करू शकणार्‍या १०० गोष्टी ऐकवल्या असत्या ..असो)
शेवटी तो दीवस उजाडला. आज महानायक रजनीकांत चा सिनेमा बघणार होतो. दुपारी १२:०० चा शो होता, म्हटल उशीर नको म्हणून १०:०० वाजताच घरातून निघालो. हो म्हटल नेमक नाहीतर ट्रॅफिक मधे अडकायच आणि रजनी दा ची एंट्री जायची 🙂

सीन १:
कामवाली बाई: साहेब, आज थोडे पैसे उधार हवे होते
बाबा: किती?
कामवाली बाई: १०० रुपये साहेब
बाबा: प्रसाद, बाईना १०० रुपये दे तर.
मी: बाई, कशाला हवे आहेत पैसे? मझयाकडे नाही आहेत सध्या.
कामवाली बाई: साहेब, पोराची शाळेची फी भरायची आहे.
मी: नाही.
(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन २:
बहादूर (गेट-कीपर): सहाबजी, वो मेरा तबियत खराब है काल से…
मी: हा तो डॉक्टर के पास जावो ना..मेरा डोका क्यु खाता है?
बहादूर: सहाबजी, १०० रुपये मिल जाता तो दवाई लेके आयेगा साहबजी.
मी: अभी नही है..जावो तुम.
(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन ३:
ट्रॅफिक सिग्नलवर बाइक थांबवली. रस्त्याचा बाजूला उभी असलेली एक भिकारी म्हातारी मझयाकडे आली.
म्हातारी: पोरा, काल पासून अन्न नाही रे पोटात. काहीतरी दे
मी: जा हो आजी मला उशीर होतोय
म्हातारी: २ रुपये तरी दे रे..चहा तरी पिल.
मी: नाही हो आजी जा तुम्ही. (सिग्नल गेला आणि मी भरधाव निघालो)

(मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून खुश होत होतो…)

सीन ४:
टौकीजवर पोहचलो, चिक्कार गर्दी होती. लोक आजकाल दसर्याला एव्हडे बाहेर जात नाही. कशी-बशी बाइक पार्किंगमधे लावली. मित्राची वाट पहात उभा होतो, तेव्हड्यात खालून कोणीतरी माझी पेंट ओढत होत. मी पहिले तर एक लाहान कळ्कट कपडे घातलेला मुलगा होता. हातात एक ताटली, त्यात ओळखु ना येणारे देव, त्यावर फूल वाहिलेली, अगरबत्ती लावलेली.
पोरगा: काका, काही द्या ना (माझी पेंट पुन्हा ओढत तो म्हणाला)
मी: नाही रे, काही नाही आहे..जा तू
पोरगा: द्या ना साहेब
मी: (ओरडून) जा ना सांगितले ना तुला काही नाही म्हणून…

तो पोरगा निघून गेला, पुन्हा दुसर्‍या कोणाची पेंट ओढायला

मी त्या ५०० रुपयाच्या सिनेमा तिकीटाकडे बघून……नाही आता मला आनद होत नव्हता…का जाणे कुणास ठाउक पण कुठेतरी चुकल्या सारखे वाटत होते.

मित्र-मन्डली आली, मी मात्र शून्यात पहात होतो. मी काही बोललो नाही. ते तिकीट फाडले आणि निघालो.
मित्र विचारात होते काय झाले?..रोबोट नाही पहायचा का?

मी: “तुम्हाला दिसत नसेल, पण मी माझयातल्या माणसाचा “भावनाशून्य रोबोट” झालेला पाहिला..आता ह्या सिनेमाची काही गरज नाही मला… “