मी नाही अभ्यास केला…

Posted: ऑक्टोबर 2, 2010 in वीनोदी
टॅगस्, , ,

हर्ष (आमचा छोकरा) ४-५ महीन्याचा असेल, तेव्हापासुन त्याला “मी नाही अभ्यास केला…” हे गीत जाम आवडते. कीतीही रडत असला तरी हे गाण म्हटल की स्वारी एकदम शात.

आता मला या गाण्याची इतकी सवय लागली आहे, की असे वाटते कधी झोप येत नसेल तर हे गाण म्हटले की पटकन झोप लागेल….असो

काल असेच टाईम-पास म्हणुन याच बालगीताचे विड़्बन केले आहे…

“मी नाही अभ्यास केला…” या बालगीताच्या चालीवर…
—————————————————
घड्याळ्यात वाजले नऊ
सगळे म्हणाले खाऊ
नाश्ता करण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले दहा
सगळे म्हणाले मेल पहा
मेल पहाण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले अकरा
बॉस ने बनवला बकरा
त्याच्या नावे बोटे मोडण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले बारा
सगळ्याच “लंच” चा नारा
“लंच” करण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले एक
सगळे म्हणाले वेट
“गप्पा” करण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले दोन
मीत्राने केला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले तिन
मला की-बोर्ड दीसुलागले तीन
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले चार
डोक्यात आले घरचे विचार
विचार करण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले पाच
डोळे म्हणाले बीबी वाच (बीबी = बुलेटीन बोर्ड किवा पब्लिक फ़ोल्डर)
बीबी वाचण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

घड्याळ्यात वाजले सहा
मी बस शोधतोय पहा
बस शोधण्यात एक तास गेला
मी नाही बग फीक्स केला||

प्रतिक्रिया
  1. संकेत म्हणतो आहे:

    मस्तच !!!!! “मी नाही अभ्यास केला” कधी वाचले किंवा ऐकले नसल्याने मला ही originalच वाटली. मूळ कविता पण प्रकाशित करा. मला वाचायला आवडेल.

  2. संकेत म्हणतो आहे:

    मस्तच… मूळ कविता वाचली किंवा ऐकली नसल्याने मला original च वाटली. “मी नाही अभ्यास केला”” वाचायला आवडेल मला. post कराल काय?

  3. तनुजा म्हणतो आहे:

    मस्त हं..!!

    good try.!

  4. Maithili म्हणतो आहे:

    हे हे हा हा… मस्तच…!!! 😀

    • Prasad म्हणतो आहे:

      पहले-पहले मला हे फ़ार काही आवडले नव्हते…पण मग रोज ऐकुन आता आवडायला लागले आहे 🙂 गाण्यासोबात तुम्ही त्या अ‍ॅक्शन सुध्धा करुन पहा…मजा येते

Leave a reply to Prasad उत्तर रद्द करा.